दहा पंचायत समिती सभापतींच्या आज निवडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

सांगली - जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींच्या निवडी उद्या (ता. 14) होणार आहेत. 10 पंचायत समित्यांपैकी कडेगाव, पलूस, आटपाडी भाजपला स्पष्ट, तर जत आणि मिरज पंचायत समितीत काठावरचे बहुमत आहे. खानापुरात शिवसेना, शिराळ्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता आणि वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत आहे. 

पंचायत समितीतील पक्षीय बलाबल 
शिराळा- राष्ट्रवादी- 4, कॉंग्रेस- 3, भाजप-1 
खानापूर- शिवसेना-5, कॉंग्रेस-1 
कवठेमहांकाळ- स्वाभिमानी आघाडी-4, राष्ट्रवादी-3, विकास आघाडी-1 
वाळवा- राष्ट्रवादी-12, रयत विकास-7, कॉंग्रेस-3 
जत- भाजप- 9, कॉंग्रेस-7, वसंतदादा विकास आघाडी-1, जनसुराज्य-1 
आटपाडी- भाजप-4, कॉंग्रेस-2, राष्ट्रवादी-2 
तासगाव- राष्ट्रवादी-7, भाजप-5 
कडेगाव- भाजप- 6, कॉंग्रेस-2. 

सभापती आरक्षण असे- 
सर्वसाधारण ः खानापूर-विटा, कवठेमहांकाळ, आटपाडी. 
सर्वसाधारण महिला ः जत, पलूस, कडेगाव. 
नागरिकांचा मागास प्रवर्गः तासगाव, वाळवा. 
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ः मिरज 
अनुसूचित जाती, महिला- शिराळा