काळ्या पैशाच्या जीवावर सत्ता मिळवणाऱ्यांचे कंबरडे मोडले

Chandrakant_Patil_
Chandrakant_Patil_

कडेगाव : नोटाबंदीच्या निर्णयामुळे आतंकवादी, नक्षलवादी व काळ्या पैशाच्या जीवावर या देशामध्ये सत्ता मिळवणाऱ्यांचेही कंबरडे मोडले, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकारांशी दिली.

ते म्हणाले, ""लोकशाहीत कोणीही आपले मत मांडू शकते. आनंदराव आडसूळ यांनी काय म्हणावं हे मी ठरवत नाही. शिवसेनेने काय करावे पक्षप्रमुख ठरवतात. नोटाबंदीच्या निर्णयावरून वेळ पडल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा श्री. आडसूळ यांनी दिला आहे. त्यावर ते बोलत होते.

ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे, की तीस डिसेंबरपर्यंत वेळ द्या. त्यानंतर जर निर्णय चुकीचा आहे, असे वाटले तर कुठल्याही चौकात फटके मारा. मला वाटते नोटाबंदीच्या निर्णयानंतर दहा दिवसांत स्थिती निवळली. बॅंकांसमोरच्या रांगा कमी झाल्या, तर काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना 500 रुपये प्रतिदिन माणसे मिळत होती. ती शाई लावायला सुरवात केल्यानंतर पळून गेली. अशा रीतीने चलन पुरवठा सुरळीत होत आहे. काही दिवसांनंतर आरोप करणाऱ्यांना वाटेल, की मोदींचा निर्णय बरोबर आहे. मोदी दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांचा निर्णय चुकणार नाही. या निर्णयाने प्रामुख्याने दहशतवादी, नक्षलवादी व काळ्या पैशाच्या जीवावर देशात सत्ता मिळवणाऱ्यांचे कंबरडे मोडले. सामान्यांचा घामाचा पैसा कुठेही जाणार नाही.''

ते म्हणाले, "सत्तर वर्षे देश व राज्यात कॉंग्रेसचे राज्य होते. कडेगावला वीस वर्षे लाल दिवा होता. तरी विकास का झाला नाही?.. इतकी वर्षे सत्ता मिळून विकास करता आला नाही, तर त्यांना पुन्हा पाच वर्षे विकासाची संधी कशाला द्यायची. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन-अडीच वर्षांत 18 हजार गावांत तीन लाखांवर जलयुक्त शिवारची कामे केली. राज्यातील पाण्याचा साठा 42 टीएमसीने वाढला. या गोष्टी करणाऱ्या भाजपला कडेगाव नगरपंचायतीची सत्ता द्या. सत्तर वर्षांत झाले नाही ते भाजप करून दाखवेल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com