विहिरीत उतरताना क्रेनचा रोप तुटून 3 मजुरांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

क्रेनचा रोप तुटून झालेल्या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू

कोल्हापूर : करवीर तालुक्यात सांगवडे येथे विहीर खुदाई करण्यासाठी क्रेनने विहिरीत उतरत असताना क्रेनचा रोप तुटून झालेल्या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला. 

या घटनेत तीनजण ठार झाले, तर एकजण जखमी झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी दोघेजण मूळचे राजस्थान येथील आहेत. ते कामानिमित्त येथे आले होते. याप्रकरणी पोलिस आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

बाबू शामराव वड्ड (राहणार- सांगावडेवाडी), रामचंद्र  साळवी, भैरूलाल माळी (सध्या राहणार - पट्टणकोडोली, मूळ गाव - चौकीया, राजस्थान) अशी ठार झालेल्याची नावे आहेत. तसेच, शिवाजी पोवार (रा. सांगवडेवाडी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.