जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे आज जिल्ह्यात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

सांगली - जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. सुमारे सव्वा तीन लाख लोकसंख्येला टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दुष्काळी तालुक्‍यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून टॅंकरची मागणी वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे 

जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे उद्या (ता. 6) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, जत आणि मिरज तालुक्‍यांतील जलसंधारण व जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामांची पाहणी करणार आहेत. 

जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे जिल्हा दौऱ्यात खानापूर तालुक्‍यातील सुलतानगादे व करंजे, आटपाडी तालुक्‍यातील खरसुंडी, बाळेवाडी व नेलकरंजी, जत तालुक्‍यातील कुंभारी व कुडणूर तसेच मिरज तालुक्‍यातील भोसे येथे जलसंधारण व जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सन 2015-16, 2016-17, 2017-18 मधील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत समावेश असलेल्या गावांतील कामांचा आढावा, त्याचप्रमाणे जलसंधारण विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेणार आहेत. त्यांच्यासमवेत जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी असणार आहेत.