कऱ्हाडजवळील टोल दर आकारणीत पाच रूपयांनी वाढ

toll
toll

उंब्रज (ता. कऱ्हाड) : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे व किमी टोलनाक्यावरील टोल दर आकारणीत १ जुलैपासून पाच रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. टोल दर वाढीचे पत्रक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने जारी केले आहे. त्यानुसार शनिवारी मध्यरात्रीपासुन नव्या दराने टोल आकारणी सुरू करण्यात आली आहे. वाहनधारकांना पाच रुपये वाढीव टोल भरावा लागत आहे. टोलदर वाढल्याने वाहनधारकांत नाराजी व्यक्त होत आहे.

कऱ्हाड तालुक्यातीव तासवडे व कोल्हापूर जिल्ह्यातील किणी येथे टोल नाके आहेत. महामार्ग चौपदरी करणानंतर दोन्ही टोलनाक्यावर आकारणी सुरू आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या कंपन्यानी येथे टोल आकारणीचा ठेका घेतला आहे. परंतू टोलचे दर प्रचंड असल्याने वाहनधारकांच्या खिशाला खात्री बसत असुन अनेक वेळा वाहनधारकांचा हा संताप टोलनाक्यावर उमटतो. बऱ्याचदा टोल वसुली वरुन वादावादी, भांडणे यासारख्या घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. एक जुलै पासुन टोलदरात आणखी वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतल्याने या डोकेदुखीत वाढ झाली आहे. 

तासवडे व किणी येथे टोल आकारणीचा ठेका कोनार्क कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. नवीने जारी केलेल्या दर पत्रकानुसार कोणत्याही एका टोलनाक्यावरुन जाणाऱ्या कार,जीप सारख्या वाहनांना ७५ रुपये, टेम्पो सारख्या मध्यम स्वरूपाच्या वाहनांना १३० रुपये, तर ट्रक बस सारख्या वाहणांना २६० रुपये टोल आकारणी केली जाणार आहे. पुर्वी हे दर पाच रुपयाने कमी होते. तसेच किणी व तासवडे टोलनाक्यावरुन एकाचवेळी जाणाऱ्या मध्यम स्वरूपाच्या वाहनांना २६० रुपये आकारणी होत आहे. पूर्वीचा दर २५० रुपये होता. तर  अवजड वाहणांना ५१५ रुपये टोल आकारणी केली जात आहे यापुर्वी ५०० रुपये टोल आकारणी केली जात होती. 

टोलदर वाढीचा वाहणधारकांना फटका बसला असुन पेट्रोल डिझेल दर वाढीबरोबरच आता टोल दरात वाढ झाल्याने महामार्गावरील प्रवास जिकिरीचा झाला आहे.  सन २००५ ला राष्ट्रीय प्राधिकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने शेंद्रे ते कागल या १३३ किलो मीटरच्या अंतरातील चौपदरी करणाचे काम पुर्ण केल्यानंतर या १३३ किलोमीटरच्या अंतरात तासवडे व किणी हे दोन टोलनाके उभारले त्यानुसार येथे टोलवसुली सुरू असुन आत्तापर्यंत १२ वेळा टोलदर बदलले असुन बहुतांशी वेळा टोलच्या दरात वाढ झाली आहे. कालांतराने टोलदर कमीकमी होत जावून टोल आकारणी पुर्ण बंद होईल ही आशा फोल ठरली असून  उलट दिवसेंदिवस टोल दरात वाढ होत असल्याने वाहणधारकांच्या खिशाला कात्री बसू  लागल्याने नाराजीचा सुरू आहे. 

पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणार्या टोलनाक्याच्या दरापेक्षा  तासवडे व किणी टोल नाक्यावर जास्त टोल आकारणी आहे. त्यातच टोलदर वाढीने  तासवडे येथील टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना वाहनधारकांच्या नाराजीला तोंड द्यावे लागत आहे. अनेक वाहनधारकांना दर वाढल्याचे परिपत्रक दाखवावे लागत असून त्यामुळे टोल वसुलीला ज्यादा अवधी लागल्याने वाहनांच्या रांगा लागत आहे.  टोलनाक्यावर वाहनांची गर्दी होवून कोंडी निर्माण झाल्याचे चित्र होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com