झाडे वाचवा; सायकल ट्रॅक करा !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

सांगली-मिरज रस्त्यासाठी विविध संघटनांचे आयुक्तांना साकडे
सांगली - सांगली-मिरज रस्त्यावर दोन्ही शहरांना जोडणारा स्वतंत्र सायकल ट्रॅक निर्माण करावा त्यासाठी या रस्त्यावरील प्रस्तावित वृक्षतोड थांबवून नियोजन व्हावे, अशी मागणी शहरातील विविध  संघटनांनी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महापालिकेचे वैभव ठरावा असा हा दोन शहरांना जोडणाऱ्या या रस्त्यावर सायकल ट्रॅक झाल्यास अनेक फायदे होणार आहे. आयुक्तांनी नागरिकांची मते जाणून घ्यावीत, असे आवाहनही या कार्यकर्त्यांनी केले आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. मनोज पाटील, डॉ. प्रियदर्शन चितळे, वाहतूकदार संघटनेचे बाळासाहेब कलशेट्टी, आभाळ माया फाऊंडेशनचे प्रमोद चौगुले, आरोग्य भारती संघटनेचे डॉ. विश्‍वास लोमटे, सांगली जिल्हा सुधार समितीचे प्रा. आर. बी. शिंदे, बहुजन  हिताय संघाचे शिवदास वाघ, मराठा क्रांती शिवजयंती मंडळाचे संजय काळोखे, रणझुंजार मंडळाचे अविनाश देवळेकर, रिक्षा चालक-मालक संघटनेचे भगवान बंडगर, विश्‍वकर्मा पांचाळ समितीचे गणेश सुतार यांनी हे निवेदन देऊन भूमिका मांडली आहे.

निवेदनात म्हटले आहे, सांगली-मिरज रस्त्याच्या रुंदीकरणास आमचा विरोध नाही. मात्र ते करताना झाडे  न तोडता काही सुवर्णमध्य साधता येतो का याचा विचार प्रशासनाने करावा. यासाठी आम्ही सायकल ट्रॅकचा प्रस्ताव मांडत आहोत. त्यासाठी सध्या या रस्त्यावरील वड, पिंपळ, लिंब अशी तोडण्यात येणारी झाडे तातडीने तोडू नयेत. झाडांमुळे या रस्त्यावर रहदारीची कोंडी झाल्याचे अद्याप चित्र नाही. त्याऐवजी रस्त्याच्या कडेला नव्याने झाडे लावावीत. सध्याच्या झाडांमुळे त्याच्या पलीकडे पादचारी मार्ग विकसित करावा. तोच सायकल ट्रॅक म्हणूनही वापरता येईल. सध्या या रस्त्यावर वाहनांचा जो काही वेग आहे तो शहरांतर्गत  वाहतुकीसाठी पुरेसा आहे. उलट आपण हा वेग नियंत्रित करण्यासाठी या रस्त्यावर नवे गतिरोधक केले आहेत. या झाडांचे जतन करून एक चांगला सामाजिक संदेश दिला जाणार आहे. आपण या झाडांची पुनर्लागवड करणार आहात. त्यातील एक-दोन प्रायोगिक तत्त्वावर लागवड करून त्याची यशस्विताही आजमावता येईल. तोपर्यंत नव्याने लावलेल्या झाडांची पूर्ण वाढ होईल.

यथावकाश अगदीच अडचणीची झाडे त्यावेळी काढता येतील. मात्र  या मार्गावर सायकल ट्रॅक केल्यास इंधन बचतीचा योग्य संदेश समाजात जाणार आहे.