ज्यादा दराने सोने खरेदीचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - पाचशे, हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्यानंतर लगेचच हे पैसे मुरवण्यासाठी काल (मंगळवारी )रात्री सोने खरेदीचा मोठा प्रयत्न काही जणांकडून झाला. मात्र तुलनेने अत्यल्प व्यवहार घडले. स्थानिक सराफांनी एकूण वातावरण पाहून हे व्यवहार टाळले. काल रात्री सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 30 ते31 हजार रुपयांच्या आसपास होता. पण 34 ते 35 हजार रुपये दराने रोखीने सोने खरेदी करायची तयारी काही जणांनी ठेवली होती. कारण पाचशे, हजार रुपयांच्या बेहिशोबी नोटा सोन्यात गुंतवण्याची काल रात्री संधी होती. 

दरम्यान, नोटा रद्द झाल्याचा परिणाम सराफ बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात झाला. आज बहुतेक व्यवहार ठप्प राहिले. सोने विक्रीसाठी चेक किंवा शंभराच्या नोटा असलेली रक्कमच स्वीकारली जात होती. मात्र खूप कमी व्यवहार झाले. सराफ बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी किमान पंधरा दिवस लागतील अशी शक्‍यता व्यक्त होत होती. 

पाचशे, हजार रुपयाच्या बेहिशोबी नोटांना शून्य किंमत असल्याचा अंदाज आल्याबरोबरच काही जणांनी तातडीची गुंतवणूक करण्यासाठी सराफ बाजाराकडे मोर्चा वळवला. दहा ग्रॅम वीस ग्रॅम खरेदीऐवजी अर्धा किलो, किलो वजनापर्यंत सोने खरेदीचा सामूहिक व वैयक्तिक प्रयत्न झाला. पण कालचे एकूण तणावाचे व भीतीचे वातावरण पाहून मोठे व्यवहार करणे सराफांनी टाळले. पॅनकार्ड पावतीने सोने द्यायची तयारी काहींनी दाखवली. पण बेहिशोबी नोटा असलेल्यांनी त्यास नकार दिला. 10 ग्रॅम मागे चार ते पाच हजार रुपये पण पावती न करता सोने खरेदीची तयारी त्यांनी दर्शवली. पण काल रात्रीच्या एकूण वातावरणात ते शक्‍य झाले नाही. 

आज सराफ बाजार नेहमीप्रमाणे सुरू झाला. पण सराफ गटागटाने चर्चा करत उभे होते. व्यवहार तुरळक तुरळक सुरू राहिले. शंभर रुपयाच्या नोटांवर किंवा चेकवर व्यवहार करता येत होते. पण चलन टंचाईच्या काळात 10 ग्रॅमला 34 ते 35 हजार रुपये व तेही शंभराच्या नोटांच्या स्वरूपात खर्च करणे लोकांनी टाळले. बॅंका बंद असल्याने चेकचेही व्यवहार फारसे झाले नाहीत. 

बेहिशोबी पाचशे व एक हजार रुपयाच्या नोटा मुरवण्यासाठी सोने खरेदीचा दर काळ्या बाजारात चाळीस हजार रुपयांपर्यंत गेला होता. पण या व्यवहारात सर्वसाधारण ग्राहक नव्हता. खरेदीची ही चर्चा करणारे वेगळ्या क्षेत्रातील लोक होते.

पश्चिम महाराष्ट्र

योजना निर्णायक वळणावर - पीकनिहाय पाणीपट्टीचे नियोजन होणार सांगली - ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या वसुलीचे नियंत्रण...

06.18 AM

सांगली - टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांची वीज जोडण्याचे आदेश...

05.45 AM

खासदार शेट्टींसमोर आव्हान - कमळाचीही पडद्याआडून साथ शक्‍य कोल्हापूर - स्वाभिमानीतून हकालपट्टी झाल्यानंतर राज्यमंत्री सदाभाऊ...

05.27 AM