'म्हाडाद्वारे ग्रामीण जनतेला घरे देण्यासाठी प्रयत्नशील'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

कोल्हापूर - म्हाडाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला घरे उपलब्ध देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पुणे विभागाच्या म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले. श्री. घाटगे यांनी आज सकाळ कार्यालयात सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांची भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये चर्चा झाली. 

श्री. घाटगे म्हणाले, ""म्हाडाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर सध्या पुणे विभागामध्ये म्हाडाच्या जागा किती आहेत, कोणते प्रकल्प सुरू आहे अशा सर्व कामांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. म्हाडाच्या माध्यमातून शहरात किंवा नगरपालिका क्षेत्रात स्वस्त घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परंतु आता ग्रामीण भागातील जनतेला ही घरांची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घरांचे स्वप्न आहेच, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्यासाठी ही आपला प्रयत्न राहील. यामध्ये कमीत कमी किमतीत घरे देण्याचा विचार सुरू आहे. म्हाडाकडे सध्या अपुुरा कर्मचारी वर्गाचाही प्रश्‍न आहे. तो प्रश्‍नही लवकर सोडवून त्यामध्ये कुशल इंजिनिअरना बरोबर घेऊन चांगले प्रकल्प उभारू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह काही अधिकाऱ्यांची चर्चा करून काही नवीन प्रकल्पही या विभागात मार्गी लावण्यात येतील. म्हाडाच्या प्रकल्पाचे सध्याचे प्रलंबित प्रश्‍नही लवकरच सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या कागलमध्ये एक प्रकल्प सुरू आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लकरच तो सुरू होईल.'' 

या वेळी मुख्य जाहिरात व्यवस्थापक आनंद शेळके, मुख्य बातमीदार निखिल पंडितराव उपस्थित होते.