हळद व्यापाऱ्यावर 'प्राप्तिकर'चा छापा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

सांगली - येथील मार्केट यार्डातील प्रसिद्ध हळद व बेदाणा व्यापाऱ्याच्या पेढीवर व कुपवाड एमआयडीसी परिसरातील कोल्डस्टोअरेजवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी छापा घातला. सायंकाळी उशिरापर्यंत पेढीतील व कोल्डस्टोअरेजमध्ये तपासणी सुरू होती. नोटाबंदीच्या निर्णयानंतर प्राप्तिकर विभागाने जिल्हा मध्यवर्ती बॅंक, माधवनगर येथील पत्रा डेपो, मिरजेतील अस्थिरोगतज्ज्ञ यांच्यावर छापे घालण्यात आले आहेत. दरम्यान, नोटाबंदीनंतर बॅंकेतील खात्यात दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा भरणा करणाऱ्या 20 बड्या व्यापाऱ्यांना "प्राप्तिकर'ने नोटिसा पाठवल्या आहेत.