हळदीने मार्केट यार्ड हाऊसफुल्ल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

दररोज १० ते १५ हजार पोती आवक

सांगली - येथील हळदीची बाजारपेठ देशभरात प्रसिद्ध आहे. येथील हळदीचा हंगाम जानेवारीच्या अखेरीस सुरू होतो. त्यानुसार सांगली बाजार समितीमध्ये आता नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. शुक्रवारी (ता.३) हळदीची सुमारे १५ हजार पोत्यांची आवक झाली. या हळदीला ५ ते १० हजारांपर्यंत प्रतिक्विंटल असा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. आवक वाढल्यामुळे  सांगली मार्केटयार्ड हळदीने हाऊसफुल्ल 
झाले आहे.  

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हळदीचा सौदा सुरू झाला असून, हळदीची आवक वाढू लागली आहे. 

बाजार समितीत दररोज स्थानिक राजारामपूर हळद  सरासरी १० ते १५ हजार पोती आवक होऊ लागली आहे. तर आंध्रची निजामाबाद हळद ही ४ ते ५ हजार पोत्यांची आवक होत आहे. या हळदीला ४ ते ९ हजारपर्यंत दर मिळत आहे. ‘कृष्णा’, ‘फुले स्वरूपा’ या वाणांच्या हळदीची बाजार समितीत क्वचितच आवक  होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. हळदीला  अपेक्षित दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कलही हळदीचे उत्पादन घेण्याकडे वाढला आहे. सांगलीसह सातारा जिल्ह्यातील शेतकरीही हळद लागवडीला प्राधान्य देत आहेत. यामुळे हळद लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

देशभरात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे यंदा आवक जास्त असणार आहे. नवीन हळद बाजार समितीत दाखल होऊ लागली आहे. सध्या बाजार समितीत हळदीचे सौदे दररोज होत आहेत. हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दर मात्र समतोल राहण्याची शक्‍यता आहे. 
- मनोहर सारडा, हळद व्यापारी

Web Title: turmeric market yard full