मराठा क्रांती वेबसाइटला अडीच लाखांवर हिटस्‌

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - सकल मराठा समाजाच्या www.marathakrantikop.com वेबसाइटला सुमारे अडीच लाखांवर हिटस्‌ मिळाल्या आहेत. दिवसेंदिवस हिटस्‌मध्ये वाढत होत असून वेबसाइटद्वारे मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने दररोज अपडेटस्‌ टाकले जात आहेत. दसरा चौकातील व्हाइट हाऊसमध्ये वॉर रूममध्ये तयार केली आहे. 

या रूममध्ये सकल मराठा सोशल मीडियाची टीम कार्यरत आहे. वॉर रूममध्ये येणाऱ्या बांधवांची ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासह मोर्चाचा मार्ग, छायाचित्रे, स्लोगन, डिझाईन वेबसाईटवर उपलब्ध केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी वेबसाईट सुरू झाल्यानंतर त्यावरील अपडेट्‌सची पाहणी ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती, शालेय विद्यार्थी यांच्याकडून होऊ लागली आहे.

त्याचबरोबर वेबसाईट्‌सच्या हिट्‌सची संख्याही वाढत आहे. आजवर वेबसाईटला अडीच लाखांवर हिट्‌स मिळाले आहेत. मराठा क्रांती मोर्चाचा दिवस जसजसा जवळ येईल, तसे वेबसाईटला हिट्‌सची संख्या दहा लाखांवर जाईल, असा विश्‍वास शिरीष जाधव यांनी व्यक्त केला.