राज्यात यंदा वीज मागणीत अडीच हजार मेगावॉटने वाढ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

सोलापूर - मागील काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचा परिणाम साहजिकच विजेच्या मागणीवर झाला आहे. मागील वर्षी एप्रिलमध्ये राज्याची विजेची मागणी 19 हजार 800 मेगावॉट इतकी होती. त्यामध्ये यंदा जवळपास अडीच हजार मेगावॉटने वाढ झाली आहे. वाढलेल्या मागणीवरून उन्हाची तीव्रता स्पष्ट होते. 

उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने घरगुती विजेच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. राज्यातील अनेक शहरांचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे साहजिकच उकाड्यात वाढ झाली आहे. उकाडा वाढल्याने आवश्‍यक असलेल्या विद्युत साधनांची मागणी वाढली आहे. त्याचा थेट परिणाम विजेच्या मागणीतील वाढीवर झाला आहे. तापमानवाढ ही प्रमुख गोष्ट असली तरी महावितरणच्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यामुळेही विजेची मागणी वाढली असण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली. घरगुती विजेच्या मागणीबरोबरच शेतीपंपासाठी लागणाऱ्या विजेची मागणीही वाढल्याची शक्‍यता आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे अद्यापही नदी, विहिरी, बोअरला चांगले पाणी आहे. त्या पाण्याचा उपसा करण्यासाठी विजेच्या वापर केला जातो. मागील वर्षी दुष्काळ असल्यामुळे उपसा बंद होता. साहजिकच मागणीही कमी होती. 

विजेच्या मागणीतील फरक (सर्व आकडे मेगावॉटमध्ये) 
यंदाची एप्रिलमधील मागणी ः 22 हजार 300 
महावितरणची मागणी ः 18 हजार 600 
गतवर्षी एप्रिलमध्ये मागणी ः 19 हजार 800 
गतवर्षी एप्रिलमध्ये महावितरणची मागणी ः 16 हजार 900 

भारनियमनापासून सुटका 
मागणी वाढली असली तरी महावितरणकडे वीज उपलब्ध आहे. महावितरणने खासगी कंपन्यांबरोबर वीज पुरवठ्यासंबंधीचे करार केले आहेत. त्यामुळे भारनियमनाच्या चटक्‍यापासून यंदा सर्वसामान्यांची सुटका झाली आहे.