आबईचीवाडी अपहरणप्रकरणी घालवाडमधील दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

कऱ्हाड - सव्वासात लाखांच्या खंडणीसाठी आबईचीवाडी येथील संजय बळवंत सुर्वे यांचे अपहरण केल्याप्रकरणी शिरोळ तालुक्‍यातील घालवाड येथील ऋषिकेश श्रीकांत भंडारी (वय 19) व स्वागत दत्तात्रय जाधव (23) यांना पोलिसांनी अटक केली. दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. अपहरण झालेले सुर्वे यांनी दोघांकडून नोकरीस लावतो म्हणून सव्वासात लाख रुपये घेतले होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. ते पैसे वसूल करण्यासाठी त्यांनी सुर्वेला नेले होते. मात्र त्यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. सुर्वेच्या विरोधात काही लोक तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आले होते.

कऱ्हाड - सव्वासात लाखांच्या खंडणीसाठी आबईचीवाडी येथील संजय बळवंत सुर्वे यांचे अपहरण केल्याप्रकरणी शिरोळ तालुक्‍यातील घालवाड येथील ऋषिकेश श्रीकांत भंडारी (वय 19) व स्वागत दत्तात्रय जाधव (23) यांना पोलिसांनी अटक केली. दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. अपहरण झालेले सुर्वे यांनी दोघांकडून नोकरीस लावतो म्हणून सव्वासात लाख रुपये घेतले होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. ते पैसे वसूल करण्यासाठी त्यांनी सुर्वेला नेले होते. मात्र त्यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. सुर्वेच्या विरोधात काही लोक तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आले होते. त्याबाबतचा गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

संजय सुर्वे यांच्या घरी संबंधित दोघे आठ मार्चला आले होते. सुर्वे दोघांनाही सोडून येतो, असे पत्नीस सांगून दुचाकीवरून गेले. मात्र, परत आले नाहीत. त्यानंतर सुर्वे यांची बहीण व पत्नीला सुर्वेच्या मोबाईलवरून कॉल करून पैशाची मागणी करण्यात आली. म्हणून पत्नीने सुर्वेंच्या अपहरणाबाबतची फिर्याद दिली होती. त्यानुसार त्या दोघांना अटक झाली आहे. सुर्वे यानेच वरील दोघांसह काही लोकांकडून सैन्यात नोकरीस लावतो, असे सांगून पैसे घेतल्याची माहिती पोलिस तापासात पुढे आली आहे. 

सात जणांची फसवणूक? 
सुर्वेच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या दोघांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सुर्वेने त्यांच्यासह सात जणांना सैन्यात नोकरीस लावतो म्हणून फसवले आहे. नोकरीच्या आमिषाने संबंधित सात लोकांनी सुमारे वीस लाख रुपये सुर्वेला दिले आहेत, असेही त्या युवकांनी पोलिसांना सांगितले आहे. त्याची खात्री पोलिस करत आहेत. त्यानुसार पुढील कारवाई होईल.