मंगळवेढा - काळविटाची शिकार करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

मंगळवेढा - काळविटाची शिकार करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

मंगळवेढा - तालुक्यातील खडकी येथे काळविटाची शिकार करणार्‍या अजय पपल्या शिंदे (वय २९) व सतिश पपल्या शिंदे (वय २५) रा.खडकी या दोघांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.   

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, खडकी येथील तांड्यावर रात्री 9 च्या दरम्यान एका काळवीटाची शिकार करून त्याचे मांस शिजवून खात असल्‍याची गोपनीय माहिती वनपरिक्षेत्रचे अधिकारी विलास पवळे यांना समजल्यावर 
पो.कॉ.सागर लांडे, राजू आवटे, महिला पोलिस रूपाली रेडेकर, वनपाल सुभाष बुरूंगले, वनरक्षक गोरख माळी, श्रीशैल्य पाटील, भागवत मासाळ, सोमनाथ होनमाने, शंकर रूपनर, दशरथ बुरूंगले, मधुकर बनसोडे, आण्णा अवघडे, रमेश माने, दर्‍याप्पा न्यामगोंडे आदींनी छापा टाकून वरील दोघांना ताब्यात घेतले. शिजवलेले काळविटाचे मांस तसेच काळवीटाची दोन शिंगे व कातडे पूर्वी शिकार केलेले काळविटाचे जुने कातडेही जप्त करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com