आळंदी पालिकेच्या घंटागाडीची दोन मुलांची धडक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

अपघातानंतर घंटागाडीसह चालक पळुन गेला.तर सत्यम भगिरथ कुंभार(12)आणी स्वरुप भगीरथ कुंभार या जखमी अवस्थेतील दोघा भावांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात भरती केले आहे.

आळंदी : कचरा गोळा करणार्‍या आळंदी पालिकेच्या घंटागाडीची दोन अल्पवयीन मुलांना आज सकाळी साडे नऊच्या दरम्यान ठोकर बसल्याने दोघेही जखमी झाले.

अपघातानंतर घंटागाडीसह चालक पळुन गेला.तर सत्यम भगिरथ कुंभार(12)आणी स्वरुप भगीरथ कुंभार या जखमी अवस्थेतील दोघा भावांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात भरती केले आहे.

आज सकाळी आळंदीत दत्तमंदीर रस्त्यावरुन कुंभार बंधु पायी चालले होते.यावेळी भरधाव वेगातील पालिकेच्या घंटागाडीची दोघांना धडक बसली. यात सत्यमच्या डोक्याला तर स्वरुपच्या खांद्याला, डोक्याला पायाला गंभिर दुखापत झाली. अपघातातील घंटागाडी  पालिकेचा कचरा वाहत होती.अपघातानंतर चालक घंटागाडीसह पळाला आणि पालिकेच्या आवारात गाडी ऊभी केली.अधिक तपास आळंदी पोलिस करत आहे.

Web Title: two boys injured in accident