तासगाव तालुक्‍यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

तासगाव - तासगाव तालुक्‍यात शुक्रवारी पुन्हा वळवाच्या पावसाने हजेरी लावली. तालुक्‍यातील वडगाव येथे झाडाखाली थांबलेल्या दोघांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला.

तासगाव - तासगाव तालुक्‍यात शुक्रवारी पुन्हा वळवाच्या पावसाने हजेरी लावली. तालुक्‍यातील वडगाव येथे झाडाखाली थांबलेल्या दोघांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला.

वडगाव येथील शाळूचा मळा परिसरात सहा जण फांद्या तोडत होते. दरम्यान, पाऊस आल्याने काम बंद करून सर्वजण घरी परत येत होते. पाऊस वाढल्याने वाटेत सर्वांनी झाडांचा आसरा घेतला. वडगाव येथील शंकर कोंडिबा पाटील आणि अरविंद राजाराम डिसले आंब्याच्या झाडाखाली थांबले होते. त्याच झाडावर विजेचा लोळ येऊन कोसळला आणि दोघेही जागीच ठार झाले. उर्वरित चौघे सुदैवाने दुसऱ्या झाडाखाली असल्याने वाचले. मृत दोघेही शेतमजूर होते.