खटाव तालुक्‍यात दोन लाखांचा अवैध शस्त्रसाठा जप्त

Two lakh illegal weapons were seized in Khatav taluka in satara
Two lakh illegal weapons were seized in Khatav taluka in satara

सातारा : खटाव तालुक्‍यातील चौघांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चार गावठी पिस्तूल व तीन जिवंत राऊंड असा सुमारे दोन लाख सात हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

विक्रम उर्फ गौऱ्या रमेश जगताप (वय 26), अजय सुभाष खवळे (वय 38, दोघे रा. नेर, ता. खटाव), धनाजी वामन मदने (वय 22, रा. आवारवाडी, ता. खटाव) व शुभम राजाराम शिंदे (वय 20, रा. औंध, ता. खटाव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर औंध व पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

अधिक्षक देशमुख म्हणाले, जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याची मोहिम राबविण्याची सुचना सर्वच अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पदमाकर घनवट यांनीही शोध मोहिम सुरू केली होती. त्यामध्ये पुसेगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बेकायदा शस्त्राच्या गुन्ह्यातील एक संशयीत नेरमध्ये घरी आला असल्याची माहिती श्री. घनवट यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक सागर गवसणे, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, जोतीराम बर्गे, मधुकर गुरव, मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीड कडव, वैभव सावंत, संतोष मोळी, अमोल जाधव, अनिल खटावकर, मारूती अडागळे, गणेश कचरे यांनी तेथे छापा टाकला. यामध्ये विक्रमला पकडण्यात आले. 

त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आढळून आले. चौकशीमध्ये त्याने आणखी तिघांना बिहारमधून आणलेली पिस्तूल दिली असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील तीन संशयीतांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये प्रत्येकाकडे गावठी पिस्तूल आढळून आली. चार पिस्तूल व तीन जिवंत राऊंड पोलिसांनी जप्त केले आहेत. ही मोहिम पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com