आणखी दोन रस्ते वाहतुकीसाठी बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

सातारा नगरपालिकेतर्फे शहरात तीन ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या नव्या पुलांचे काम युद्धपातळीवर व्हावे, यासाठी कोटेश्‍वर मंदिर ते अर्कशाळा रस्ता, तसेच अमेरिकन चर्च (सदरबझार) चौक ते श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे उद्यान हे रस्ते आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. या रस्त्यांवरील वाहतूक परिसरातील अन्य रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. 
 

सातारा - सातारा नगरपालिकेतर्फे शहरात तीन ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या नव्या पुलांचे काम युद्धपातळीवर व्हावे, यासाठी कोटेश्‍वर मंदिर ते अर्कशाळा रस्ता, तसेच अमेरिकन चर्च (सदरबझार) चौक ते श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे उद्यान हे रस्ते आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. या रस्त्यांवरील वाहतूक परिसरातील अन्य रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. 

सातारा पालिकेच्ये माध्यमातून शुक्रवार पेठेतील कोटेश्‍वर चौक ते गेंडामाळ नाका (शाहूपुरी) रस्त्यावर कोटेश्‍वर चौकात, तसेच अर्कशाळा आणि सदरबझार येथील अमेरिकन चर्च चौक ते श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे उद्यान रस्त्यावर उद्यानालगत अशा तीन ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. या तिन्ही पुलांच्या कामांचे भूमिपूजन नुकतेच खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी खासदार भोसले यांनी ही कामे आगामी सहा महिन्यांत पूर्ण झाली पाहिजेत, अशी सूचना केली होती. या पुलांची कामे तत्काळ पूर्ण व्हावीत, यासाठी या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. आगामी सहा महिन्यांसाठी या परिसरातील वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले आहे. 
 

Web Title: Two more roads closed for transport