अंकलखोपला दोघांवर भरचौकात कोयत्याने वार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

भिलवडी - दुचाकीचा आरसा हाताला लागल्याने झालेल्या वादानंतर अंकलखोप (ता. पलूस) येथील प्रवीण तानाजी सूर्यवंशी व मित्र योगराज दिनकर सपकाळ यांच्यावर कोयत्याने हल्ला झाला. भाडण सोडवण्यास गेलेल्या विकास संभाजी सूर्यवंशी (वय 27), धनंजय अनिल पाटील यांनाही लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण झाली. आज दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दौलत अनिल पाटील, हृषीकेश प्रकाश उपाध्ये, अरविंद अनिल पाटील यांच्यावर भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी माहिती दिली, की अंकलखोपमध्ये म्हसोबाची यात्रा सुरू आहे. दुपारी चारच्या सुमारास प्रवीण आणि योगराज हे धनंजयची दुचाकी घेऊन म्हसोबा मंदिराकडे गेले होते. जाताना दुचाकीचा आरसा दौलत पाटीलच्या हाताला लागला. त्यावरून वाद झाला. त्यानंतर साडेचारच्या सुमारास प्रवीण, योगराज, विकास, धनंजय हे चौघे पाण्याच्या टाकीजवळ थांबले होते. त्याचवेळी दौलत, हृषीकेश, अरविंद तेथे आले. दौलतच्या हातात कोयता होता. कोयता उगारून शिव्या देत तो थेट प्रवीण आणि योगराजच्या अंगावर धावून गेला. कोयत्याने दोघांच्या हातावर वार केला. दोघांच्या हातातून रक्त आल्यानंतर विकास आणि धनंजयने दौलतला अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दौलतचे साथीदार अरविंद आणि हृषीकेशने दोघांना अडवून शिवीगाळ करून लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. हल्ल्यानंतर दौलतने "तुम्हाला जिवंत ठेवत नाही' अशी धमकी दिली. त्यानंतर तिघेजण निघून गेले. यात्रा सुरू असताना भरचौकात हा प्रकार घडल्यामुळे थोडी पळापळ झाली. हल्ल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

जखमी प्रवीण व योगराज यांच्यावर भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. जखमी प्रवीणचा चुलतभाऊ विकास सूर्यवंशी याने भिलवडी पोलिस ठाण्यात सायंकाळी फिर्याद दिली. त्यानुसार दौलत, हृषीकेश, अरविंद या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत कोणास अटक झाली नव्हती. 

टॅग्स