पारनेरमध्ये दोन गावठी बंदुकी आणि चार जिवंत काडतुसे जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

पारनेर - निघोज गव्हाणवाडी रस्त्यावर हमालवाडी नजिक एकास जोरदार धडक देऊन पसार हाणाऱ्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी पकडले. यामध्ये दुचाकीस्वार आणि धडक बसलेला व्यक्ति असे दोघे जखमी झाले. नागरिकांनी पोलिसांना याबाबत कळवले असून, प्रताप मंजाबा साळुंखे (वय- 53) या दुचाकिस्वाराला अटक करण्यात आली. याच्याकडून दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (ता. 25) रात्री सव्वाआठ वाजणेच्या सुमारास हमालवाडी नजिक प्रताप साळुंके याने दुचाकीवरून जात असताना समोरून आलेला रतीराम बाबुराव ढेरंगे यास दुचाकीची जोगदार धडक दिली. यात ढेरंगे (रा. कुरूंद) गंभीर जखमी झाले. त्या वेळी साळुंके पळून जात असताना तेथील ग्रामस्थांनी त्यास पकडून ठेवले व पोलीसांना कळविले. त्या नंतर साहायक पोलिस निरीक्षक संजय मातोंडकर, निघोज दूर क्षेत्राचे हवलदार अशोक निकम व शिवाजी कावडे तसेच पोलीस दिवटे, पवार, भिंगारदिवे, आव्हाढ, भावसे,देवढे, आदींनी घटनास्थली धाव घेतली तेथे तेथे साळुंखे यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कडे त्यांना एक गावठी बनावटीचा कट्टा व तीन जिवंत काडतुसे सापडली. 

दरम्यान पोलिस चौकशीत जेथे अपघात झाला तेथे एक कट्टा फेकल्याचे त्याने सांगितले. घटनास्थळी शोध घेतला असता तेथे दुसरा कट्टा व एक जिवंत काडतुस सापडले. अशा प्रकारे साळुंके याच्याकडून दोन गावठी कट्टे व चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.     

वरीष्ठांना ही माहीती कळविल्यानंतर सहाय्यक पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया व पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी यांनी घटना स्थाळाला भेट दिली. साळुंखे कोण आहे त्याच्याकडे ही अवैध शस्त्रे कशी आली व आपघात या बाबतचा पुढील तपास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मातोंडकर करत आहेत. यात जखमी रतिराम डेरंगे यांना शिरूर येथील माणिकचंद धारिवाल रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचाही उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची माहीती पारनेर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मातोंडकर यांनी दिली.     

Web Title: Two pistol guns and four live cartridges seized in Parner