हाणामारीप्रकरणात दोन पोलिस निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

सांगली - सांगली शहर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस आणि त्यांचे समर्थक गुंड यांच्यात सोमवारी झालेल्या हाणामारीची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. यातील पोलिसांना निलंबित केल्याचे कोल्हापूर विभागाचे विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी बुधवारी जाहीर केले. 

पोलिस शिपाई किरण राजाराम पुजारी (वय 28, उदगाव, ता. शिरोळ), पोलिस शिपाई संतोष हरी पाटील (वय 33, रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यांना बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा नांगरे बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिला. पुजारी व पाटील यांच्यावर "मोका'अंतर्गत कारवाईचाही विचार केला जाईल, असे ते म्हणाले. 

दरम्यान, दोन पोलिसांसह 11 जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. फरारी असलेल्या सागर राजाराम पुजारी याला आज सकाळी सांगली ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले.

पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड : येथील कऱ्हाड, पाटण शिक्षक सोसायटीच्या इमारत नुतनीकरण, थकबाकी आणि शाखा विस्ताराच्या विषयावरून आज (सोमवार) झालेल्या...

10.33 AM

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात चांगला पाऊस झाला. चोवीस तासात नवजाला ३१ व महाबळेश्वरला २९ मिलीमीटर पाऊस...

09.48 AM

राजारामपुरीतील स्थिती - डॉक्‍टरांसह वाहनधारकांतून नाराजी, पोलिसांनी टाकली नांगी...

09.00 AM