सरकार निकम्मे; म्हणूनच सुव्यवस्थेचे प्रश्न : उद्धव ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

नगर : सरकार निकम्मे असल्यानेच सर्वत्र कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यातही राज्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री असायला हवा. मात्र, तो नसल्याने स्थिती आणखी गंभीर होत जाईल. गृहखात्यासाठी स्वतंत्र मंत्री असण्याची गरज आहेच.

तसेच नगरमधील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी आता कृष्णप्रकाशसारख्या कडक अधिकाऱ्याचीच गरज असल्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

केडगावमधील पोटनिवडणुकीनंतर सुवर्णानगर येथे शिवसेना उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व त्यानंतर गळे चिरून हत्या करण्यात आली. या दोन्ही परिवाराचे आज ठाकरे यांनी सांत्वन केले. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार चंद्रकांत खैरे व सदाशिव लोखंडे, शिवसेना महिला आघाडीच्या राज्यप्रमुख रिटा वाघ, शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे आदींसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

संसार उध्वस्त करणारांना फासावर लटकवा; उद्धव ठाकरे यांना निवदेन

ठाकरे म्हणाले, ''शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांचा कारभार त्यांना सरकारने स्वतंत्रपणे करु द्यायला हवा. त्यात हस्तक्षेप नकोच. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. ती राखली जाणार नसेल तर, शिवसैनिकांचा उद्रेक होईल. त्याचा दोष शिवसैनिकांना देऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन सत्तेवर आलेले सरकार महाराजांच्या नावाप्रमाणे सरकार वागत नाही. शिवाजी महाराज यांच्या काळात अशा पद्धतीने कधीच महिलांचे कुंकु पुसण्याचे काम झाले नाही. सरकारनेच गुन्हेगारांना हाताशी धरल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.'' 

बाळासाहेब पवारांच्या कुटुंबियांची घेतली भेट 
सावकारकीच्या जाचाला कंटाळून अलिकडेच आत्महत्या केलेल्या उद्योजक बाळासाहेब पवार यांच्या परिवाराने देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पवार यांच्या आत्महत्योबाबत पवार यांची कन्या डॉ. अमृता हीने भूमिका मांडली. ठाकरे व मंत्री रामदास कदम यांनी त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली.

पवार यांच्या परिवारालाही न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन ठाकरे यांनी दिले. तसेच त्यांच्या परिवारास घेऊन मुंबईला येण्याची सूचना त्यांनी शिवसैनिकांना केली.

पुरावे द्या; शिवसैनिकांना अटक करु : दीपक केसरकर

Web Title: Uddhav Thackray criticizes Maharashtra Government