फेब्रुवारीतच वैशाख वणवा

फेब्रुवारीतच वैशाख वणवा

कोल्हापूर - जिल्हा, शहर परिसरात गुलाबी थंडीचा जोर ओसरला असून फेब्रुवारी महिन्यात लोकांना वैशाख वणव्याची झळ बसू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान ३० ते ३७ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहिले. रात्रीही जाणवणारी बोचरी थंडी नाहीशी झाली असून एरव्ही जिल्ह्यात मार्चच्या मध्य किंवा शेवटच्या आठवड्यापासून तीव्रतेने जाणवणारा उन्हाळा जानेवारीच्या मध्यापासूनच सुरू झाला. धुके, दवाचे प्रमाणही तुलनेने कमी राहीले. विशेष म्हणजे, कित्येक वर्ष स्थिर असणारा हा जिल्ह्यातील तापमानाचा ‘पॅटर्न’ २०११ पासून सतत बदलत आहे. 

जानेवारीतील तापमान (अंश सेल्सिअस)
ॲक्‍यु वेदरवरील नोंदीनुसार २१ ते ३१ जानेवारीपर्यंत तापमानात अधिक वाढ झाली. हे तापमान २२ ला ३६, २३ ला ३७, २८ ते ३० दरम्यान ३६ तर १९ ते २१ दरम्यान ३४, २४ ला ३५, २६ ला ३५ डिग्री सेल्सिअस इतके होते. म्हणजे २१ ते ३१ दरम्यान तापमानात चढ-उतार झाल्यामुळे अनेकदा दुपारी तीव्र उकाड्याचा अनुभव नागरिकांना आला. आकाशही निरभ्र राहिले. आर्द्रता १९ टक्के राहिली.     

फेब्रुवारीतील तापमान 
तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान ३० ते ३२, सहाला २९, सातला ३१, आठला ३२, नऊ ते १२ फेब्रुवारीला ३१, १३ ला ३५, १४ ला ३७, १५ ला ३६, १६ ला ३८, १७ ला ३९, १८ ला ३८, १९ ला ३७, २० ला ३२, २१ ला ३१ तर आज (ता. २२) ३७ डिग्री सेल्सिअस तापमान राहिले.   

वारे आणि तापमान 
सर्वसाधारणपणे जिल्ह्यात वारे हे पश्‍चिमेकडून वाहतात; पण मार्च-एप्रिलमध्ये निम्म्याहून अधिक काळ ते विशेषत: दुपारनंतर पूर्वेकडूनही वाहतात. दिवसाचे सर्वसाधारण तापमान जास्त असते. पश्‍चिम घाटावरून येणाऱ्या सागरी वाऱ्यांमुळे सायंकाळी चारनंतर तापमान कमी होऊ लागते. रात्री वातावरण आल्हाददायक असते. एप्रिल ते मे दरम्यान दोन ते तीन वेळा मेघगर्जनेसह पाऊसही होतो. एप्रिलमध्ये २५ मि.मी. तर मेमध्ये ४० मीटरपर्यंत पाऊस होतो. या काळात साधारणत: वार्षिक पर्जन्यमानाच्या दहा टक्के पर्जन्यवृष्टी होते; पण दिवसा-रात्रीचे तापमान आणि उन्हाळ्यातील पर्जन्यवृष्टीचा हा पॅटर्न २०११ पासून सातत्याने बदलत आहे. विशेष म्हणजे २०१६ मध्ये फक्त एकदाच वीजगर्जनेसह पाऊस झाला.   
 
आजारापासून राहा दूर  
विशेषत: तीव्र तापमानात निर्माण होणाऱ्यया अनेक जीवाणू, विषाणूंमुळे टायफॉईड, गालगुंड, कावीळ, तीव्र डोकेदुखी, त्वचेवर लाल रंगाची पुरळ उठणे, पाठदुखी, गोवर, कांजिण्या, सर्दी-पडसे, विविध ॲलर्जी होणे, कान-नाक-घसा-डोळ्याचे विकार, त्वचाविकार, जननेंद्रियांशी संबंधित विकार, विषाणू किंवा सूक्ष्म जंतूच्या संसर्गामुळे होणारा जठर आणि आतड्याचा दाह, डायरिया, मूत्रमार्गाशी संबंधित विकार, उलट्या, जळजळ, कोणत्याही पदार्थाची शिसारी येणे, अन्नातून विषबाधा, डास आणि दूषित पाण्यामुळे निर्माण होणारे आजार, अन्य साथीचे रोग या काळात होतात. विशेषत: उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेही रुग्णांनी उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. 

फळे खा भरपूर  
उन्हाळ्यात द्राक्षे, कलिंगड, टरबूज, मोसंबी, संत्री, आंबे, पपई, शहाळी, पपनस, लिंबू, काही प्रमाणात अननस, किवी, नासपती आणि सफरचंद ही परदेशी फळे, जांभूळ, करवंदे, तोरणे, नेरलं, पिकलेली कटकं हा जंगली मेवा बाजारात उपलब्ध होतो. या सर्व फळांत शर्करा, पाणी, खनिजे, जीवनसत्त्वांचे प्रमाण भरपूर असते. यामुळे ही फळे भरपूर खावीत; जेणेकरून अनेक आजार दूर राहतात. शरीरातील पाण्याची पातळी समतोल राहते. शिवाय शरीरही बदलत्या तापमानाला अनुकूल राहते.  

विक्रीही जानेवारीपासून 
शीतपेये, कैरीचे पन्हे, ताक, लस्सी, जलजिरा, कलिंगडे, टरबूज, द्राक्षे, पॅकेजिंग केलेले विविध फळांचे रस, लिंबू सरबत, आईस्क्रिम, उसाचा रस आदींची एरव्ही एप्रिल-मेममध्ये विक्रीत वाढ होत असे; मात्र या पदार्थांच्या विक्रीत जानेवारीपासूनच वाढ झाली. शिवाय, माठ विक्रीही सुरू झाली. दुपारी १२ ते चार वेळेत उन्हाचा दाह जाणवत असल्यामुळे रस्त्यांवरील वर्दळही कमी होत आहे. 
 
फ्लेम ऑफ फॉरेस्ट 
गेल्या दोन वर्षांपासून फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणून गौरविलेले पळस, पांगेरा, काटेसावर, बहावा हे वृक्ष उन्हाच्या तीव्रतेमुळे जानेवारीच्या मध्यापासूनच फुलत आहेत. यावर्षीसुद्धा ही झाडे लवकर फुलली तर २०१६ मध्ये उशिरा मोहोरलेला आंबा यंदा चांगल्या थंडीमुळे लवकर मोहोरला. उन्हामुळे फळधारणेला वेग आला आहे. काही प्रजातींचे आंबेही बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. वारे आणि तापमान सर्वसाधारणपणे जिल्ह्यात वारे हे पश्‍चिमेकडून वाहतात; पण मार्च-एप्रिलमध्ये निम्म्याहून अधिक काळ ते विशेषत: दुपारनंतर पूर्वेकडूनही वाहतात. दिवसाचे सर्वसाधारण तापमान जास्त असते. पश्‍चिम घाटावरून येणाऱ्या सागरी वाऱ्यांमुळे सायंकाळी चारनंतर तापमान कमी होऊ लागते. रात्री वातावरण आल्हाददायक असते. एप्रिल ते मे दरम्यान दोन ते तीन वेळा मेघगर्जनेसह पाऊसही होतो. एप्रिलमध्ये २५ मि.मी. तर मेमध्ये ४० मीटरपर्यंत पाऊस होतो. या काळात साधारणत: वार्षिक पर्जन्यमानाच्या दहा टक्के पर्जन्यवृष्टी होते; पण दिवसा-रात्रीचे तापमान आणि उन्हाळ्यातील पर्जन्यवृष्टीचा हा पॅटर्न २०११ पासून सातत्याने बदलत आहे. विशेष म्हणजे २०१६ मध्ये फक्त एकदाच वीजगर्जनेसह पाऊस झाला.   
 

फ्लेम ऑफ फॉरेस्ट 
गेल्या दोन वर्षांपासून फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणून गौरविलेले पळस, पांगेरा, काटेसावर, बहावा हे वृक्ष उन्हाच्या तीव्रतेमुळे जानेवारीच्या मध्यापासूनच फुलत आहेत. यावर्षीसुद्धा ही झाडे लवकर फुलली तर २०१६ मध्ये उशिरा मोहोरलेला आंबा यंदा चांगल्या थंडीमुळे लवकर मोहोरला. उन्हामुळे फळधारणेला वेग आला आहे. काही प्रजातींचे आंबेही बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत.

अनेक गृहितकांना तडा 
जिल्ह्यात ४३.३ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असंभवनीय आहे.
मार्चपासून तापमान जलद गतीने वाढत जाते. 
एप्रिलमध्ये ते कमाल मर्यादा गाठते. 
एप्रिल हा वर्षातील सर्वात जास्त तापमानाचा महिना. 
मार्च ते मेमधील तापमान हे ३५.६ ते ३५ डिग्री सेल्सिअस असते. 
एप्रिलमध्ये ३७.८ सेल्सिअसपेक्षा अधिक दैनिक कमाल तापमान अनेकदा असते. 
दैनिक कमाल तापमान १८.९ ते २२.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत बदलत जाते. 

मात्र या गृहितकांना वाढत्या तापमानाने धक्का बसण्यास २०१४ पासूनच सुरवात झाली. २०१६ च्या उन्हाळ्यात मराठवाडा, विदर्भ, खानदेश, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा कहर सुरू असताना जिल्ह्यात हेच तापमान ४४ ते ४५ डिग्री सेल्सिअसच्या आसपास स्थिरावले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com