"दो दिल मिल गये.. मगर चुपके चुपके' 

"दो दिल मिल गये.. मगर चुपके चुपके' 

सांगली - गेल्या काही दिवसांपासून त्याला अन्‌ तिला काय होतंय हेच कळतच नव्हतं. हृदयाची धडधडही वाढलेली जाणवायची. डोळ्यांसमोरची सारखी तिच प्रतिमा दिसायची. मग, यालाच प्रेम म्हणतात हे समजले तर होते. पण, व्यक्त कसे करायचे यासाठी आज अनेक बहाणे पहायला मिळले. कुणी बिनधास्तपणे समोरासमोर जाणून प्रेम व्यक्त केले. तर कुणी फेसबुक, वॉटस्‌अप सारख्या आभासी जगातून "चुपके चुपके' प्यार का इझहार केला. उत्तर मिळेपर्यंत धडधड सुरूच होती, अखेर सकारात्मक उत्तरानंतर जल्लोष करत, प्रमाणिक प्रेम निभावणार असल्याचा वादा साऱ्या प्रेमवीरांनी केला. निमित्त ठरले "व्हॅलेंटाइन डे'चे. 

आपण ज्यांना आवडतो आणि आपल्यालाही जी माणसे मनापासून आवडतात त्यांना हक्काने आणि आठवणीने काही देण्याचा हा व्हॅलेंटाईन सोहळा मोठ्या उत्साहात रंगला. सकाळपासून अगळेवेगळे प्लॅनिंग करत "प्रपोझ' करण्यात आले. त्याबरोबरच गुलाबाचे फूल आणि गिफ्टचीही जोड होती. काही जण नाराज झाले पण, बहुतांश जणांनी आपले प्रेम व्यक्त करत "दिल की बात' ओठांवर आणली. तरुणांनीही आपल्या आवडत्या मित्राची पहिल्यापासून पारख केल्याने सकारात्मकता दाखवली. त्यामुळे यंदाचा व्हॅलेंटाईन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दुसऱ्या बाजूला शहरातल्या प्रेमवीरांची काळजी घेत "व्हॅलेंटाइन डे'साठी बाजारपेठही चांगलीच सजली होती. सारी गिफ्ट शॉप्स्‌ हाऊस फुल्ल होते. बहुतांश रेस्टॉरंटही बुक होते. कारण तिथल्या सवलती प्रेमाचा हा रंग आणखी द्विगुणित करत होत्या. "सीसीडी', "मॉल'मध्येही तरुणाईची गर्दी लक्षणीय होती. मुव्ही पाहण्यासाठीही आगाऊ बुकिंग झाले होते. 

गुलाबाचे फुलासह ब्रॅंडेड घड्याळे, ज्वेलरी, सॉफ्ट टॉईज, फोटोफ्रेमस्‌, कपल स्टॅच्यु, परफ्युम असे अनेक टीपिकल गिफ्टस्‌ देण्यावर अधिक भर होता. त्याचबरोबर चॉकलेटस्‌ आणि ग्रीटिंग कार्डही दिले जात होते. राममंदिर चौकत गुलाबांच्या फुलांपासून बनवलेल्या बदमात सेल्फी काढण्यासाठी अनेक तरुणांची गर्दी झाली होती. त्यामुळे यंदाचा व्हॅलेंटाइन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

आभासी जगात प्रेमवीर "छा गये..' 
फेसबुक, वॉटस्‌अप सारख्या आभासी जगात गेल्या आठवड्याभरापासून विविध डे साजरे केले जात होते. मध्यरात्रीपासून व्हॅलेंटाइनच्या शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत होता. या प्रेमाच्या सरीत सारी तरुणाई चिंब झाली होती. तसेच विविध चारोळ्या करत प्रेमवीर शेअर करत होते. त्यामुळे आभासी जगात आज प्रेमवीर छा गये.. अशीच प्रतिक्रिया उमटत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com