लक्ष्मीपुरीत व्हॅन पेटली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

कोल्हापूर - लक्ष्मीपुरीतील स्वयंभू गणेश मंदिराजवळ उभ्या असलेल्या व्हॅनने आज सकाळी अचानक पेट घेतला. त्यामुळे परिसरात काहीसा गोंधळ निर्माण झाला. अग्निशामक दल आणि पोलिसांच्या मदतीने आग अटोक्‍यात आणली. यात मोटारीचे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली. 

विचारेमाळ येथील जमीर नूरमहंमद शेख हे आज सकाळी आपली व्हॅन घेऊन लक्ष्मीपुरीत आले होते. काम आटोपून सकाळी सव्वादहाच्या सुमारास स्वयंभू गणेश मंदिराशेजारी रस्त्याकडेला व्हॅन पार्किंग केली. त्यानंतर ते काही कामासाठी खाली उतरले. तेवढ्यात त्यांच्या व्हॅनच्या बोनेटमधून अचानक धूर येऊ लागला. बघता बघता व्हॅनने पेट घेतला. नागरिकांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली. तातडीने तेथे अग्निशामक
दलाचे जवान दाखल झाले. 

दरम्यान, लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक रोखली. अवघ्या काही मिनिटांत जवानांनी ही आग आटोक्‍यात आणली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. ही आग गॅस सिलिंडर लिकेज झाल्याने लागली असावी, अशी शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली.

Web Title: van burned in Laxmipuri