भ्रूणहत्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करा- वर्षा देशपांडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

डॉ. सुधाकर कोरे म्हणाले, "तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात जास्तीत जास्त मुलींना प्रवेश देऊन संस्कारश्रम शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, विनयानंद महाराज ऊर्फ के. डी. धनवडे, जिग्नेश ठक्कर यांची मनोगत झाले.

घुणकी : "मुलगाच हवा, या चुकीच्या कल्पनेतून भ्रूणहत्या होत आहेत. यापूर्वीच आरोग्य विभागाने तक्रारीची दखल घेतली असती तर भ्रूणहत्या थांबल्या असत्या. या प्रकरणी सरकारने संबंधितावर कठोर कारवाई करावी', अशी मागणी दलित विकास मंडळ व लेक लाडकी अभियानच्या प्रवर्तक ऍड. वर्षा देशपांडे यांनी केली.

नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील महात्मा गांधी हॉस्पिटलच्या प्रांगणात झालेल्या महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजी संघटनेचे अध्यक्ष डॉ. शैलेश कोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण केले. या वेळी ऍड. देशपांडे बोलत होत्या. महात्मा गांधी मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. सुधाकर कोरे अध्यक्षस्थानी होते.
शैलेश कोरे यांनी स्वागत केले. ऍड. देशपांडे म्हणाल्या, "सध्या आरोग्य व शिक्षण खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. हा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. हा भ्रष्टाचार अनेक पिढ्यांवर परिणामकारक ठरत असल्याने डॉक्‍टरांनी समानता व अहिंसा पाळणे गरजेचे आहे. महाराष्ट्र रेडिओलॉजी संघटना राज्यभर कार्यरत आहे. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून लेक वाचवा अभियान वाढीस नेऊन मुलींची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.'

डॉ. सुधाकर कोरे म्हणाले, "तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात जास्तीत जास्त मुलींना प्रवेश देऊन संस्कारश्रम शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, विनयानंद महाराज ऊर्फ के. डी. धनवडे, जिग्नेश ठक्कर यांची मनोगत झाले.
नूतन अध्यक्ष डॉ. कोरे यांच्यासह अठरा पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. वारणा आरोग्य, शिक्षण, सहकार बोधचिन्हाचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. डॉ. कोरे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पदग्रहण शपथ दिली.
प्राचार्य डॉ. हरिष कुलकर्णी, उपप्राचार्या डॉ. गायत्री कुलकर्णी, डॉ. शिल्पा कोठावळे, रावसाहेब पाटील, सुभाष पाटील, गोविंद जाधव, प्रा. प्रदीप तोड़कर, विजय धनवडे, सुभाष देसाई, एन.आर. पाटील, अनिल पाटील, विश्वनाथ पाटील, कार्यकारी संचालक विजयकुमार कोले, शरद महाजन, के. एम. वाले, रूपाली कोरे, राशी कोरे उपस्थित होते. डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. दीपक झावरे यांनी सूत्रसंचालन केले. एन. एच. पाटील यांनी आभार मानले.