मराठमोळ्या कारभारणींनी अनुभवला व्हायब्रण्ट गुजरात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या महिला सरपंचांची राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेस उपस्थिती

मिरज - सांगली जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या कारभारणींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या व्हायब्रण्ट गुजरातचा अनुभव घेतला. थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी त्यांना मिळाली. निमित्त होते... स्वच्छ भारत योजनेंतर्गत महिला सरपंचांसाठी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे.

गुजरातमध्ये गांधीनगर येथे कार्यशाळा झाली. देशातील सहा हजारांवर महिला सरपंच निमंत्रित होत्या. जिल्ह्यातून ६३ आणि मिरज तालुक्‍यातून सहा सरपंचांना संधी मिळाली. गाव हागणदारीमुक्त केलेल्या सरपंचांनाच निमंत्रित केले होते. दिवसभर कार्यशाळा आणि मोदींचा संदेश यानंतर सरपंचांना व्हायब्रण्ट गुजरातची सैर घडवण्यात आली. विकासाचे वैविध्यपूर्ण प्रकल्प राबवलेल्या गावांत सरपंचांना नेण्यात आले. मोदींच्या दूरदृष्टीतून विकासाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या गावांचा अनुभव सरपंचांनी घेतला. ग्रामस्थांची एकजूट करून गावे स्वावलंबी कशी करता येतात याचे धडे मिळवले. निर्मलग्राम, अपारंपरिक ऊर्जेवर स्वयंपूर्णता, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याच्या योजना, प्रदूषणविरहित उद्योग, महिलांनी घरोघरी सुरू केलेले छोटे उद्योग पाहिले. मेहनतीने जगवलेली गावाभोवतालची वनराई पाहिली. 

देशाचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले. ग्रामीण भाग असतानाही तंत्रज्ञान वापरात त्यांनी आघाडी घेतली होती. मोदींनी गुजरातला खऱ्या अर्थाने व्हायब्रण्ट बनवल्याचे महिलांनी पाहिले.

Web Title: viabrant gujrat experience