काँग्रेस बचाओ-भाजप बढाओ अभियान!

सचिन शिंदे
सोमवार, 16 एप्रिल 2018

कऱ्हाड - विधानसभा निवडणुकांना अद्याप वेळ असला तरी आतापासून मतदारसंघात अनेक उलाढाली होत आहेत. त्याला कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अपवाद कसा असेल? स्वतःला ‘प्रेझेंट’ करण्याचा प्रयत्न येथेही होतो आहे. माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार विलासराव पाटील-उंडळाकर यांच्या एकत्रिकरणाची चर्चा पुन्हा वाऱ्याचे वेगाने सुरू आहे. त्यांच्या एकत्रिकरण व राष्ट्रवादीच्या सहकार्यातून काँग्रेस बचाओ व अतुल भोसले यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून योगगुरू रामदेवबाबा यांचे शिबिर घेत भाजप बढाओचे अभियान सध्या जोरदार आहे. योग शिबिराला कोणताही राजकीय टच नाही.

कऱ्हाड - विधानसभा निवडणुकांना अद्याप वेळ असला तरी आतापासून मतदारसंघात अनेक उलाढाली होत आहेत. त्याला कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अपवाद कसा असेल? स्वतःला ‘प्रेझेंट’ करण्याचा प्रयत्न येथेही होतो आहे. माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार विलासराव पाटील-उंडळाकर यांच्या एकत्रिकरणाची चर्चा पुन्हा वाऱ्याचे वेगाने सुरू आहे. त्यांच्या एकत्रिकरण व राष्ट्रवादीच्या सहकार्यातून काँग्रेस बचाओ व अतुल भोसले यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून योगगुरू रामदेवबाबा यांचे शिबिर घेत भाजप बढाओचे अभियान सध्या जोरदार आहे. योग शिबिराला कोणताही राजकीय टच नाही. मात्र, त्यामागचा चेहरा बरेच काही सांगून जातो. 

कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस भक्कम आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी नेहमीच काँग्रेसशी मिळतेजुळते धोरण घेताना दिसली. आमदार चव्हाण यांच्या विरोधात तर त्यांनी उमेदवारही दिला नव्हता. मात्र, त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर यांनी अर्ज भरला होता. त्यावळेची काय राजकीय स्थिती होती, यापेक्षा विधानसभेच्या निकालानंतर बाबा व काका गटाच्या समर्थकांची दोघेही नेते एकत्र येण्याची सुप्त इच्छा दिसून आली. त्या इच्छेला आता सोशल मीडियाचे व्यासपीठही मिळाले आहे. त्यावरून अनेक बिनीचे कार्यकर्ते त्यांचे म्हणणे मांडत आहेत. मुंबईत एका मोठ्या नेत्याच्या मध्यस्थीने काका व बाबा यांची बैठक झाल्याच्या चर्चेला दोन दिवस उधाण आले आहे. त्याला ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांनीही उघड नसले तरी छुपे समर्थन दिल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे काका व बाबा यांच्या एकत्रिकरणाच्या इच्छा जाहीरपणे व्यक्त होत आहेत. त्यामागे दक्षिणेतील काँग्रेस बचाओचे धोरण आहे. दोन्ही नेते किंवा त्यांच्या पहिल्या फळीतील जबाबदार कार्यकर्तेही अद्याप त्यावर काहीही बोलले नाहीत. अर्थात मौनम्‌ सर्वार्थ साधनम्‌ असेही सूत्र त्यामागे असू शकते. 

भाजपच्या गोटात सध्या काय चालले आहे, यापेक्षा भाजपने त्याची मदार विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या हाती दिली आहे. शहरासह तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांना सोबत पहिला टप्पा म्हणून रामदेवबाबांचे शिबिर घेतले. रामदेवबाबा यांना केवळ शहरापुरते त्यांनी मर्यादित ठेवले नाही. त्यांनी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यावरही नेले. तेथेही तोच प्रकार दिसला. त्यामुळे रामदेवबाबांच्या साथीने भाजप बढाओ अभियान त्यांनी नक्कीच हाती घेतले आहे.

Web Title: vidhansabha election politics Congress BJP