विधी प्राधिकरणाला मिळालेला पुरस्कार हा शाहू महाराजांच्या विचारांचा गौरव : मोरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला मिळालेला पुरस्कार हा तर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा गौरव आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी केले. जिल्हा बार असोसिएशनतर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

कोल्हापूर - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला मिळालेला पुरस्कार हा तर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा गौरव आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी केले. जिल्हा बार असोसिएशनतर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला राज्यातील सर्वोत्कृष्ट विधी सेवा प्राधिकरणाचा पुरस्कार जाहीर झाला. दिल्लीत सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्तींच्या हस्ते 9 नोव्हेंबरला याचे वितरण केले जाणार आहे. त्याचधर्तीवर विधी सेवा प्राधिकरणाचे चेअरमन तथा मुख्य जिल्हा न्यायाधीश आर. जी. अवचट, सचिव न्यायमूर्ती उमेशचंद्र मोरे यांचा जिल्हा बार असोसिएशनतर्फे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

श्री. मोरे म्हणाले, ""राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात उच्च न्यायालय सुरू केले. त्यांच्याच विचारावर काम करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने तृतीयपंथी, वारांगना अशा वंचित घटकाचे प्रश्‍न समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना आवश्‍यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. याचीच दखल घेत विधी सेवा प्राधिकरणाची पुरस्कारासाठी निवड झाली. या कामात सर्व न्यायाधीश, कर्मचारी आणि जिल्हा बार असोसिएशनने केलेले सहकार्य लाखमोलाचे आहे. हे सांघिक यश आहे. न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी,

जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रकाश मोरे, माजी अध्यक्ष ऍड. विवेक घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. न्यायाधीश सुनील वेदपाठक, के. डी. बोचे, असोसिएशनचे सह सचिव ऍड अन्शुमन कोरे, महिला प्रतिनिधी ऍड. मेघा पाटील, सदस्य ऍड. अनुजा देशमुख, ऍड. मोहन पाटील, ऍड. मोहन पोवार, ऍड. यतिन कापडीया, ऍड. गुरू हारगे, ऍड. मिथुन भोसले उपस्थित होते. असोसिएशनचे सचिव ऍड. सर्जेराव खोत यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष ऍड. अरुण पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Vidhi pradhikaran award is glory of Shahu Maharaj : More