कॉंग्रसचे ज्येष्ठ नेते विजयकुमार चोपडे भाजपमध्ये 

कॉंग्रसचे ज्येष्ठ नेते  विजयकुमार चोपडे भाजपमध्ये 

भिलवडी - येथील कॉंग्रसचे ज्येष्ठ नेते व माजी सरपंच विजयकुमार चोपडे यांनी नुकताच अनपेक्षितपणे भाजप प्रवेश केला. आमणापुरातील एका कार्यक्रमात भाजपाचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख उपस्थित होते. माजी पतंगराव कदम यांच्या गटाचा मोहरा भाजपाच्या गळाला लागला आहे. गावच्या आगामी राजकारणाने नवे वळण घेतले आहे.

श्री. चोपडे वसंतदादा गटाचे, त्यातही मदन पाटील यांचे अत्यंत निकटचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी गावच्या सरपंचकीबरोबर सांगली साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, तासगाव कारखाना संचालक, विकास सोसायटी अध्यक्ष म्हणून काम केले. कॉंग्रेस पक्षात वेगळा ठसा उमटवण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी स्थानिक कॉंग्रेस गटाला विरोध दर्शवत भाजपशी हातमिळवणी करीत सत्ता बदलात सामील झाले. वरच्या राजकारणात मी कॉंग्रेसच्या बरोबरच असल्याचे त्यांनी सांगितले, तर माझा गट आणि कार्यकर्ते टिकवण्यासाठी पंचायत निवडणुकीत ही युती केल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत त्यांच्या गटाला अडीच वर्षे सरपंचपद दिले जाणार आहे. सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार नूतन भाजपा जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर सरपंच झाले. वर्षभराच्या कार्यकालानंतर त्यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला. जिल्हा परिषद निवडणुकीत ते कॉंग्रेसतर्फे इच्छुक होते. परंतु संधी मिळाली नाही. तरीही त्यांनी पक्षाची कास सोडली नाही. मात्र त्यांच्या अनपेक्षित भाजपा प्रवेशाने कॉंग्रेस विशेषतः पतंगराव कदम गटाला धक्का मानला जातो. त्याचे राजकीय दूरगामी परिणाम होण्याचे संकेत आहेत. कॉंग्रेस पक्षात न्याय मिळत नसल्याने घुसमट होत आहे, त्यामुळे पक्षांतर केल्याचे श्री. चोपडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com