वाॅटर कप स्पर्धेच्या श्रमदानासाठी गावकऱ्यांचे हात एकवटले

paani
paani

मंगळवेढा : दुष्काळी तालुक्यात जलयुक्त शिवारच्या यशस्वी क्रांतीनंतर आता पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वाॅटर कप स्पर्धेच्या श्रमदानासाठी अनेकांचे हात एकवटले असून ही श्रमदानाची चळवळ 35 गावात उत्फुर्तपणे राबविली जात आहे. त्यांना मदतीसाठीही स्वंयसेवी संस्था व व्यक्ती पुढे आले.

तालुक्यातील दुष्काळी 35 गावे पाणीप्रश्नावरून गाजली असून पाण्यासाठी अजून प्रतिक्षेत असली तरी कृषी खात्याने तालुक्यातील 63 गावात जलयुक्त शिवारचे चांगले काम केल्यामुळे चांगले परिणाम दिसून आले. उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागणीची संख्या देखील घटली. आता दुष्काळी शिवारातील पाणी जिरवण्यासाठी पाणी फाउंडेशनने पुढाकार घेतला असून त्यांना आ. भारत भालके व भारतीय जैन  संघटनेच्या वतीने ही मदतीची भूमिका घेतली.

पाणी फांउडेशनने तालुक्यातील 81 गावाला भेटी देवून यात सहभागी होण्यासाठी परावृत्त करुन 100 गुण निश्‍चीत केले. यामध्ये शोष खडडे,रोपवाटीका,श्रमदान/मनुष्यबळाचा वापर करुन बांधलेल्या मृदा आणि जलसंधारणाची रचना,यंत्राचा वापर करुन बांधलेल्या मृदा आणि जलसंधारण रचना,एरिया ट्रीटमेंट आणि रिज उपचारावर योग्य भर,रचनाची गुणवत्ता, मनसंधारण,मुलस्थांनी मृदा उपचार,पाणी बचत तंत्रज्ञान,वॉटर बजेट,अगोदर आस्तित्वात असणाय्रा रचानाची दुरुस्ती यावर गुणांकन निश्चित केले. यासाठी 53 गावे तयार झाली पण मेंडसिंगी येथे झालेल्या प्रशिक्षणात 35 गावांनीच सहभाग घेतला.

त्यामध्ये देगाव, मल्लेवाडी, गुंजेगाव,  मुंढेवाडी, नंदुर, हिवरगाव, खोमनाळ,निंबोणी, चिक्कलगी, पौट, आसबेवाडी, जंगलगी, हुलजंती, लवंगी, सलगर बु,येळगी, संत चोखामेळा नगर, पाठखळ, गणेशवाडी, मेटकरवाडी, डोंगरगाव, कचरेवाडी, लेंडवे-चिंचाळे, शिरसी, गोणेवाडी, खुपसंगी, हाजापूर, नंदेश्‍वर, मानेवाडी, लोणार, पडोळकरवाडी, महमदाबाद हु,मारोळी, शिरनांदगी, रडडे ही गावे सहभागी झाली सध्या खुपसंगी, संत चोखामेळा नगर, शिरसी, लेंडवे चिंचाळे, येळगी, आसबेवाडी, शिरनांदगी, मुंढेवाडी, डोंगरगाव, गणेशवाडी, कचरेवाडी या गावात रोपवाटीका, शोषखडडे, सलग समचल चर, कंपाटमेंट बांध, कामाला सुरुवात झाली.

पाणी फाउंडेशनने  निवडलेल्या गावांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुका समन्वयक श्रीनिवास गंगणे, जितेंद्र गडहिरे, तांत्रीक सहायक वैभव इंगळे, तांञिक प्रशिक्षक वैभव जगदाळे, सामाजिक प्रशिक्षक वसीम शेख प्रयत्न करीत आहे.

जलयुक्त शिवारचे तालुक्यात चांगले परिणाम दिसले राहिलेल्या गावाचेही प्रस्ताव मंजुरीचे पाठवले आहे. लोक श्रमदानातून पाणी अडवून जिरवण्यासाठी पुढे येत असल्याने यांचा भविष्यात निश्‍चीत लाभ होणार आहे, असे तालुका कृषी अधिकारी नामदेव गायकवाड यांनी सांगितले. 

पाणी फांउडेशनच्या 100 गुणातून 15 गुण पुर्ण केले त्यांना भारतीय जैन संघटनेच्या वतीने 250 तास जेसीबी किंवा 100 तास पोकलेन देण्यात येणार आहे.सध्या डोंगरगाव व आसबेवाडी यांना दोन गावात सहभाग नोंदवला असे राहूल शहा यांनी सांगितले. 

दुष्काळी तालुक्यातील उत्फुर्तपणे गावे सहभागी होत असून गावकरी देखील श्रमदान करत असल्याने ही चळवळ यशस्वी होणार, असे तालुका समन्वयक श्रीनिवास गंगणे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com