महाबळेश्वरातील जमिनी बळकावणाऱ्यांना मोका लावू - विश्वास नांगरे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

वाई - गावागावांतील अवैध धंदे आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्थानिक नागरिकांनी जागरुक राहून पोलिस दलाला सहकार्य करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येथे व्यक्त केली. सातारा जिल्ह्यात विशेषतः पाचगणी व महाबळेश्वर येथील जमिनी बळकावणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई अथवा तडीपार करण्यात येईल तसेच युवती व महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने वातावरण तयार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

वाई उपविभागातील पोलिस ठाण्यांच्या वार्षिक तपासणीच्या निमित्ताने येथील किसन वीर महाविद्यालयात ‘पोलिस अधीक्षक शंभर ग्रुप’ मधील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पाटील, उपअधीक्षक राजाराम पाटील, जनता शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा.नारायणराव चौधरी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी तालुक्‍यातील गणेश ढवळे, सूरज मोहिते, अंबादास पवार, चंदकांत देशमुख, बापूराव धुरगुडे, दुधे-पाटील या हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिकांनी विविध प्रश्न उपस्थित करून वर्षभरात पोलिसांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. अधीक्षक डॉ. संदीप पाटील, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक निरीक्षक तृप्ती सोनावणे, नारायण पवार, बाळासाहेब भरणे यांच्या कामकाजाबाबत समाधानही व्यक्त केले.       

श्री. नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘निर्भया पथके अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यात येतील. त्यासाठी शासनाने ७० लाख रुपये दिले आहेत.

महाबळेश्वर व पाचगणीतील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शास्वत आराखडा तयार करण्यात येत आहे. याठिकाणी एक कोटी २४ लाख रुपये निधीतून पोलिसांसाठी १२ क्वार्टर्सचे काम दोन महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर २४ क्वार्टर्सचे काम हाती घेण्यात येणार आहे.’’ पोलिस पाटील रिक्तपदांच्या भरतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी आजच चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.          

पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, ‘‘भिलार व पाचवड येथे पोलिस आउटपोस्ट सुरू करण्यात येतील. युवती व महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणाऱ्यांना प्रोत्साहन व सहकार्य दिले जाईल. पोलिस मित्र योजनेत महाविद्यालयीन युवकांचा समावेश करण्यात येईल.’’ प्राचार्य चंद्रकांत येवले, अरुण गाडे, डॉ. सतीश बाबर, डॉ. अनिल राजपुरे, संतोष पिसाळ, महादेव मस्कर, प्रीती सोनावणे, प्रा. इनामदार, राजेंद्र भिलारे, पद्मा शिंदे, रामभाऊ सावंत, गणेश गोळे, प्रा. कांबळे, संपत कांबळे, स्वाती पेडणे, किरण गुरव, अनिल शिंदे, प्रकाश मोरे आदींनी संवाद साधला. उपअधीक्षक पाटील यांनी प्रास्ताविक केले. पोलिस निरीक्षक वेताळ यांनी स्वागत केले. सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Web Title: vishwas nangare patil talking