बहुरंगी लढतींत मतविभागणी निर्णायक 

राजेंद्र वाघ - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

कोरेगाव - ल्हासुर्णे गणातील दुरंगी सामना वगळता उर्वरित ठिकाणच्या बहुरंगी लढतींमध्ये शिवसेना, भाजप, अपक्षांकडे वळणारी मते कॉंग्रेस व राष्ट्रवादीला कोठे फायद्याची, तर कोठे तोट्याची ठरू शकतात. त्यात अधिक फायदा कोणाचा होतो, यावरच निवडणुकीची सर्व समीकरणे अवलंबून असल्यामुळे पंचायत समितीच्या सत्तेसाठी तालुक्‍यात दोन्ही कॉंग्रेसमध्ये मोठी चुरस आहे. 

कोरेगाव - ल्हासुर्णे गणातील दुरंगी सामना वगळता उर्वरित ठिकाणच्या बहुरंगी लढतींमध्ये शिवसेना, भाजप, अपक्षांकडे वळणारी मते कॉंग्रेस व राष्ट्रवादीला कोठे फायद्याची, तर कोठे तोट्याची ठरू शकतात. त्यात अधिक फायदा कोणाचा होतो, यावरच निवडणुकीची सर्व समीकरणे अवलंबून असल्यामुळे पंचायत समितीच्या सत्तेसाठी तालुक्‍यात दोन्ही कॉंग्रेसमध्ये मोठी चुरस आहे. 

पंचायत समितीचे सभापतिपद खुले असल्याने खुल्या चार गणांतील निवडणुकीला महत्त्व आले आहे. पिंपोडे गणामध्ये राष्ट्रवादीचे संजय साळुंखे, कॉंग्रेसचे राजेंद्र ह. धुमाळ, शिवसेनेचे संतोष सोळसकर, भाजपचे राजेंद्र ग. धुमाळ यांच्यात चौरंगी लढत आहे. राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात मतांची विभागणी कशी होते, यावरच या गणाचा निकाल ठरेल. कुमठे गणात एकूण सहा उमेदवार आहेत. त्यापैकी धर्मराज जगदाळे (भूमाता), राजेंद्र जगदाळे (शिवसेना), राजाभाऊ जगदाळे (राष्ट्रवादी), हणमंत जगदाळे (कॉंग्रेस) हे चार उमेदवार कुमठे गावातीलच आहेत. त्या शिवाय "मनसे'चे श्रीकांत जाधव, भाजपचे घनशाम शिंदे रिंगणात आहेत. त्यामुळे कुमठे गावातील मतविभागणी लक्षात घेता गणातील अन्य गावांमध्ये कोण मताधिक्‍य घेणार, यावर विजय कोणाचा, हे ठरेल. एकंबे गणामध्ये शिवसेनेचे मालोजी भोसले, कॉंग्रेसचे दुष्यंत शिंदे, राष्ट्रवादीचे विजयसिंह शिंदे यांच्यात तिरंगी लढत होईल. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराचा मुख्य प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचा उमेदवार, की कॉंग्रेसचा? याविषयी चर्चा रंगू लागली आहे. वाठार किरोली गणामध्ये राष्ट्रवादीचे सुरेश उबाळे, शिवसेनेचे संदीप नलवडे, कॉंग्रेसचे अण्णासाहेब निकम, अपक्ष जितेंद्र भोसले व अधिक पवार यांच्यात पंचरंगी लढत होत आहे. कॉंग्रेसमधून बंडखोरी केलेले जितेंद्र भोसले यांच्या उमेदवारीने या ठिकाणी चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. ल्हासुर्णे गणातील कॉंग्रेसच्या सुमित्रा घोरपडे व राष्ट्रवादीच्या सुप्रिया सावंत यांच्यातील दुरंगी सामनाही लक्षवेधी ठरेल. देऊर गणामध्ये कॉंग्रेसच्या पुष्पा चौधरी, राष्ट्रवादीच्या साधना बनकर, भाजपच्या जयश्री महामुनी; वाठार स्टेशन गणामध्ये कॉंग्रेसच्या रुक्‍मिणी अडागळे, शिवसेनेच्या पुष्पा गायकवाड, राष्ट्रवादीच्या मंगल गंगावणे; किन्हई गणामध्ये भाजपचे अमोल भुजबळ, अपक्ष अमोल राशीनकर, राष्ट्रवादीचे डॉ. निवृत्ती होळ; साप गणामध्ये राष्ट्रवादीच्या दर्शना अडसुळे, कॉंग्रेसच्या शुभांगी काकडे, भाजच्या माधुरी पंडित याप्रमाणे तिरंगी लढती होत आहेत. सातारारोड गणामध्ये शिवसेनेच्या निर्मला कदम, भाजपच्या मीरा जाधव, राष्ट्रवादीच्या शीला झांजुर्णे, कॉंग्रेसच्या भाग्यश्री ढाणे यांच्यात चौरंगी लढत होत आहे. 

पंचायत समितीत सत्तेसाठी चांगली चुरस 
कोरेगाव तालुक्‍यात पंचायत समितीसाठी बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत. अटळ ठरणारी मतविभागणी कोणाच्या फायद्याची, तर कोणाच्या तोट्याची ठरू शकते. त्यामुळे तालुक्‍यातील दोन्ही कॉंग्रेसमध्ये पंचायत समितीच्या सत्तेसाठी चागंलीच चुरस निर्माण झाली आहे. भाजप, शिवसेनेसह अपक्षांकडूनही चांगले आव्हान मिळण्याची शक्‍यता आहे.

Web Title: vote dividing in multiple flights election