केंद्रापर्यंत येऊनही मतदार माघारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

सोलापूर - माझे नाव यादीत असणारच अशी खात्री बाळगत आधारकार्ड, पॅनकार्ड असे पुरावे घेऊन मतदार मतदान केंद्रावर येत होते. परंतु, मतदार यादीत नावच नसल्यामुळे अनेक मतदारांना माघारी जाण्याची वेळ आली. त्यामुळे अशांची निराशा झाली.

विधानसभा निवडणुकीत मतदान केलेल्या अनेक मतदारांची नावे महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीत मात्र सापडली नाहीत. आम्ही गेल्या निवडणुकीत मतदान केले आहे. मग आता कसे नाव नाही, या नाही तर दुसऱ्या यादीत तरी आहे का, असे प्रश्‍न विचारत मतदारांनी मतदान केंद्र अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. मतदान केंद्राच्या बाहेर 100 मीटर दूर अंतरावर बसलेल्या विविध पक्षांच्या प्रतिनिधींकडे असलेल्या मतदार यादीमध्ये, ऍपमध्ये तसेच विविध संकेतस्थळांवरील यादीत आपले नाव आहे का, याबाबतची विचारणा या नागरिकांकडून करण्यात येत होती. येथेही नाव न मिळाल्यामुळे निराश झालेल्या नागरिकांनी घरी जाणे पसंत केले.

Web Title: voters returned to the voting center