#VoteTrendLive सोलापूरकरांनाही लागलं 'कमळा'चं याड!

टीम ई सकाळ
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, तर महापालिकेचे सभागृह नेते कॉंग्रेसचे संजय हेमगड्डी, माजी महापौर आरीफ शेख यांना पराभूत व्हावे लागले आहे.

सोलापूर : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली असून, आतापर्यंत लागलेल्या निकालात १६ जागांवर विजय मिळवला आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेला 9 जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला जबर फटका बसला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला चार, तर कॉंग्रेसला एका जागेवर विजय मिळाला आहे. पहिल्यांदाच महापालिकेत एमआयएमने खाते खोलले असून एका जागेवर विजय मिळवला आहे. 

राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, तर महापालिकेचे सभागृह नेते कॉंग्रेसचे संजय हेमगड्डी, माजी महापौर आरीफ शेख यांना पराभूत व्हावे लागले आहे.

महापालिकेच्या प्रभाग 1, 8 आणि 9 मध्ये सर्व भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग १२ मध्ये भाजपचे तीन उमेदवार निवडून आले असून, प्रभाग चारमध्ये एका जागेवर भाजने विजय मिळवला आहे. 

भाजपाचे विजयी उमेदवार :
प्रभाग १ 
- रविंद्र गायकवाड, राजश्री कनके, निर्मला तांबे आणि अविनाश पाटील

प्रभाग ९
 - राधिका पोसा, रामेश्वर बिरू, नागेश वल्याळ, अविनाश बोमड्याल.

प्रभाग ८
 - अमर पुदाले, शोभा बनशेट्टी, सोनाली मुटकेरी, नागेश भोगडे

प्रभाग 12

शशिकला बत्तुल, देवी झाड़बुके आणि राजेश अनगिरे यांनी विजय मिळवला.

प्रभाग 4

भाजपचे अमित जगदीश पाटील यांनी विजय मिळवला असून, ते सर्वांत कमी वयाचे उमेदवार आहेत.

प्रभाग 2

पालकमंत्री देशमुख यांचे चिरंजीव डाॅ. किरण देशमुख यांची विजयाच्या दिशेने कूच सुरू आहे. 

प्रभाग दहा

शिवसेनेचे पॅनेल विजयी झाले आहे. या ठिकाणी प्रथमेश कोठे, सवित्रा सामल, विठ्ठल कोटा, मीराबाई गुर्रम यांनी विजय मिळवला आहे.

प्रभाग 12

शिवसेनेच्या विनायक कोंड्याल यांनी विजय संपादित केला आहे.

कॉंग्रेसला धक्का
कॉंग्रेसने प्रभाग 16 मधुन विजयाचे खाते खोलले असून या ठिकाणी फिरदोस पटेल विजयी झाल्या आहेत. मात्र, महापालिकेचे सभागृह नेते कॉंग्रेसचे संजय हेमगड्डी यांना पराभूत व्हावे लागले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस फटका
राष्ट्रवादी कॉंग्रेसला जबरदस्त धक्का बसला असून, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या किसन जाधव, नागेश गायकवाड आणि सुवर्णा जाधव यांनीन प्रभाग 22 मधून विजय मिळवला. याच प्रभागातून एमआयएमच्या पुनम बनसोडे विजयी झाल्या आहेत. 

Web Title: #VoteTrendLive BJP gains in Solapur municipal corporation