सांगली जिल्हा परिषद : सदाभाऊंचे पूत्र सागर पिछाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजता सर्व तालुक्‍यात सुरु झाली. पहिले कल हाती आले तेंव्हा भाजप 4, शिवसेना 3, कॉंग्रेस 1 तर राष्ट्रवादी दोन गटात विजयी मार्गावर आहेत.

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजता सर्व तालुक्‍यात सुरु झाली. पहिले कल हाती आले तेंव्हा भाजप 4, शिवसेना 3, कॉंग्रेस 1 तर राष्ट्रवादी दोन गटात विजयी मार्गावर आहेत. 

वाळवा : बागणी गटातून मंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत पिछाडीवर, 

खानापूर : शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांनी नागेवाडी गटातून विजय मिळवला. अन्य दोन जागांवरही शिवसेना आघाडीवर आहे. 

शिराळा : सत्यजीत देशमुख कोकरुड गटातून आघाडीवर आहेत. तेथील गणातील कॉंग्रेसचे उमेदवारही आघाडीवर आहेत. 

कवठेमहांकाळ : ढालगाव गणातून विकास चंद्रकांत हाक्के विजयी झाले. राष्ट्रवादीचे मनोहर पाटील देशिंग गणातून विजयी झाले. रांजणीमधून राष्ट्रवादीच्या निलम पवार विजयी, कोकळे गणातून राष्ट्रवादीचे दिपक ओलेकर विजयी, राष्ट्रवादी व स्वाभीमानी आघाडीचे चार उमेदवार आघाडीवर, 

तासगाव : सावळज गटातून राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील आघाडीवर, वायफळे गणातून शुभांगी पाटील आघाडीवर, 

मिरज : पुर्व भागातील कवलापूर, मालगाव, बेडगमधून गटातून भाजप आघाडीवर, एरंडोली आणि भोसे गटातून कॉंग्रेस आघाडीवर.

Web Title: #VoteTrendLive Sangli Zilla Parishad counting Sadabhau Khot's son trailing