मतदान यंत्रे पाठवण्‍यावरुन पेच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

सोलापूर - महापालिका सार्वत्रिक निवडणुकीतील २६ पैकी तब्बल २१ प्रभागातील निकालाबाबत न्यायालयीन वाद आहेत. त्यामुळे इतर महापालिकांसाठी मागणी करण्यात आलेल्या निवडणुकीसाठी कोणत्या प्रभागाचे मतदान यंत्रे पाठवायची याबाबत महापालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

सोलापूर - महापालिका सार्वत्रिक निवडणुकीतील २६ पैकी तब्बल २१ प्रभागातील निकालाबाबत न्यायालयीन वाद आहेत. त्यामुळे इतर महापालिकांसाठी मागणी करण्यात आलेल्या निवडणुकीसाठी कोणत्या प्रभागाचे मतदान यंत्रे पाठवायची याबाबत महापालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत मतदान यंत्रात घोळ झाल्यासंदर्भात सर्वाधिक याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यापैकी बहुतांश याचिकांवर अंतिम निर्णय झालेला नाही. अनेक याचिकांचा दाखल करून घेत, न्यायालयाने संबंधित प्रभागातील यंत्रे सील करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, राज्यातील काही महापालिकांमध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी संबंधित महापालिकानी मतदान यंत्रे देण्यासाठी सोलापूर महापालिकेकडे पत्रे पाठविली आहेत. त्यानुसार स्थानिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी न्यायालयीन वाद असलेल्या व नसलेल्या प्रभागांची यादी तयार केली आहे. त्यानुसार पाच प्रभाग वगळता इतर सर्व प्रभांगामध्ये जवळपास सर्व जागांसंदर्भातील याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत.

प्रभाग २६ ब मध्ये अपत्याच्या कारणावरून दाखल झालेली याचिका प्रलंबित आहे. उर्वरीत सर्व प्रभागामध्ये मतदान यंत्रामध्ये घोळ झाल्याच्या याचिका प्रलंबित आहेत. या याचिकांचा अंतिम निकाल लागलेला नाही. ज्या प्रभागातील निकालाबाबत न्यायालयीन वाद आहेत, ते वगळून इतर प्रभागातील यंत्रे पाठवावी अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस केली आहे. त्यानुसार वाद नसलेल्या प्रभागातील मतदान यंत्रे पाठविण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे.

एकही न्यायालयीन वाद नसलेले प्रभाग
 प्रभाग १०,१३,१५, १८ व १९

Web Title: Voting machines