डफळापूर येथे टॅंकरने पाणीपुरवठ्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

सांगली (प्रतिनिधी) ः डफळापूर (ता. जत) येथे पाण्याची टंचाई भीषण होऊ लागली आहे. पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी गावातील लोकांनी जिल्हा प्रशासनाकडे जादा टॅंकरची मागणी केली आहे; परंतु, टॅंकर अद्यापही सुरू झाले नाहीत. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
डफळापूर गावात लवकरात लवकर टॅंकर सुरू करण्यात यावे, अशी मागणीकरूनसुद्धा टॅंकर सुरू झाले नसल्यामुळे ग्रामस्थांनी जत तालुक्‍याचे तहसीलदार अभिजित पाटील यांना घेराआे घातला. पाण्याचे टॅंकर सुरू केले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला अाहे.

डफळापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यातच प्रशासनाने टॅंकरची संख्या कमी केली आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. या गावात सध्या दोनच टॅंकर सुरू असल्याने आठवड्यातून दोन वेळाच गावाला पाणी मिळते आहे. त्यामुळे त्यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहेत. या बैठकीत जादा टॅंकरच्या मागणीचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील तलाठी कार्यालयात तहसीलदार अभिजित पाटील यांनी अचानक भेट देण्यास आले होते. याची माहिती गावातील ग्रामस्थांना मिळताच तहसीलदार यांच्या भेटीसाठी सरपंच, उपसरपंचासह गावातील ग्रामस्थ गेले. त्या वेळी त्यांना घेराआे घातला. ग्रामस्थ आणि तहसीलदार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. लवकर टॅंकर सुरू केले नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.

Web Title: water demand in dafalapur