नाशिक: रक्तमिश्रित पाणीपुरवठा; पोलिसांचा तपास सुरु

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

जुने नाशिक - येथील भोईगल्ली कथडा भागात आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास रक्तमिश्रीत पाणीपुरवठा झाला. परिसरातील रहिवाश्‍यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

रक्तमिश्रीत पाणीपुरवठा झाल्याने परिसरात गोंधळ निर्माण होवून तणावाची परिस्थिती निर्माण झाली. भद्रकाली पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनीच महापालिका अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. महापालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ परिसरात खोदाकाम सुरु करत रक्तमिश्रीत पाणी पुरवठा होण्याचे कारण शोधण्याचे काम सुरु केले आहे. दरम्यान आठ दिवसांपासून नळांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार रहिवासी करत असतानाही अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक महिलांकडून सांगण्यात आले. तसेच दूषित पाणी होत असल्याने परिसरातील पूनम मंगेश शिवदे (वय.25) युवतीचा कावीळमुळे मृत्यू झाल्याची माहिती यावेळी रहिवाशांनी दिली.

याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी परिसरातील अनधिकृत कत्तलखाने शोधून त्यावर कारवाई करून ते बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय, तातडीने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
- देवयांनी फरांदे (आमदार)