कर्नाटकला पाणी, जिल्ह्यात टंचाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

सांगली - कर्नाटकला कोयनेतून पाणी देण्यात येत आहे; तर राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या छायेत आहेत. सांगली जिल्ह्यातील १७२ गावे तहानलेली असल्याचे चित्र आहे. पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. १७२ गावांमध्ये  पिण्याच्या पाण्याची टंचाई असून त्यांना १७५ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यासाठी १६७ खासगी टॅंकर सुरू आहेत. एकूण ३ लाख ८८ हजार ८१२ लोकसंख्येला हा पाणी पुरवठा सुरू आहे.

जिल्ह्यात पाणीटंचाईने गतवर्षीपेक्षा भीषण रूप धारण केले आहे. गेल्या वर्षी १६३ गावे टंचाईग्रस्त होती. यंदा हाच आकडा १७२ पर्यंत पोहोचला आहे. एकट्या जत तालुक्‍यात ८५ गावांना ९५ टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या  आठवड्यात हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाने उदार धोरण घेऊन टॅंकरची मागणी करणाऱ्या सर्व गावांना टॅंकर मंजूर केल्याने हा आकडा वाढला आहे. मात्र त्याचा आर्थिक बोजा प्रशासनावर  पडत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वळवाच्या पावसाने दुष्काळी तालुक्‍यांमध्ये हजेरी  लावली तरी पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी झालेले नाही.

जतसह तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर आणि आटपाडी या तालुक्‍यांमध्येही पाणी टंचाई गंभीर झाली आहे. या सर्व तालुक्‍यांमध्ये ८५ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शिवाय शिराळा तालुक्‍यातील दोन गावांनाही टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एकूण १७२ गावे आणि १२८५ वाड्यांना पाणी देण्यात येत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन  आणि लोकप्रतिनिधींकडूनही प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे दरवर्षीचा हा प्रश्‍न सुटण्याऐवजी गंभीर होत आहे.