निम्म्या शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

कोल्हापूर - वीजपुरवठ्याअभावी शिंगणापूर पाणी योजनेचे पंप बंद राहणार असल्याने सोमवारी (ता. ७) निम्या शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे. शिंगणापूर, आपटेनगर, कसबा बावडा उपसा केंद्राकडील जल उपसा केंद्र बंद राहणार आहेत. मंगळवारीही (ता. ८) अपुऱ्या व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. उन्हाचा कडाका वाढत असताना त्यात भर म्हणून शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ए, बी, ई वॉर्ड, तसेच उपनगरातील पाणीपुरवठा बंद राहील. बालिंगा उपसा केंद्रावर अवलंबून असलेल्या शहराच्या जुन्या भागातील पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

ए व बी वॉर्ड -
फुलेवाडी तसेच रिंगरोड परिसर, कणेरकरनगर परिसर, निचितेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, जिवबा नाना परिसर, आपटेनगर रिंगरोड परिसर, महाराष्ट्रनगर, सुवर्णनगर, बापूरामनगर, साळोखेनगर, तपोवन, देवकर पाणंद परिसर, नाळे कॉलनी, संभाजीनगर व बस स्थानक परिसर, विजयनगर, शहाजी वसाहत, रेसकोर्स, शिवाजी पेठ परिसर, मंगळवार पेठ परिसर, श्रीकृष्ण कॉलनी, रायगड कॉलनी, जरगनगर, एलआयसी कॉलनी, आर. के. नगर, हॉकी स्टेडियम, आयसोलेशन, नेहरूनगर, सुभाषनगर, शेंडापार्क परिसर, राजेंद्रनगर.

ई वॉर्ड
शुगर मिल परिसर, कसबा बावडा परिसर, लाईन बाजार, नागाळा पार्क, रमणमळा, न्यू पॅलेस परिसर, ताराबाई पार्क, न्यू शाहूपुरी, स्टेशन रोड परिसर, बी. टी. कॉलेज परिसर, साईक्‍स एक्‍स्टेंशन, शिवाजी पार्क परिसर, रुईकर कॉलनी, कावळा नाका, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, लोणार वसाहत, मार्केट यार्ड परिसर, शिवाजी उद्यमनगर, राजारामपुरी परिसर, राजारामपुरी, तवनाप्पा पाटणे हायस्कूल, टाकाळा खाण व माळी कॉलनी परिसर, राजारामपुरी एक्‍स्टेंशन, दौलतनगर, प्रतिभानगर, पांजरपोळ परिसर, शास्त्रीनगर, जवाहरनगर, सम्राटनगर, राजेंद्रनगर परिसर, स्वातंत्र्यसैनिक वसाहत.

Web Title: water supply close