सांगलीत लालेलालऽऽऽ कलिंगड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

सांगली - अचानक वाढलेल्या तापमानामुळे घशाला पडलेली कोरड घालविण्यासाठी नागरिकांची पावले आपोआपच रसाळ फळांकडे वळू लागतात. सध्या सांगली शहराच्या प्रत्येक चौकाचौकात आलेली लालेलालऽऽऽ कलिंगडे त्यांची घशाची कोरड घालविण्याचे काम करतात. 40 ते 80 रुपयांपर्यंत कलिंगडाची किंमत आहे. 

विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये रोज कलिंगडाचे 5 ते 6 ट्रक आवक होत आहे. यामध्ये किमान 40 टनांपेक्षा अधिक कलिंगड असतात. 

सांगली जिल्ह्यातील मिरजपूर्व भाग, आटपाडी, सांगोला, पंढरपूर या भागातील शेतकरी कलिंगडांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. या वर्षी हवामान कलिंगडाच्या पिकासाठी पोषक असल्याने पीक मोठ्या प्रमाणात आले आहे. अचानक वाढलेल्या तापमानामुळे कलिंगडाला मोठी मागणी या भागातून होत आहे. या भागातून "शुगर किन' या जातीचे कलिंगड मार्केटमध्ये दाखल झाली आहेत. या कलिंगडाचे दर 50 रुपये डझनपासून 500 रुपये डझनापर्यंत आहेत. 

सांगली बाजारपेठमध्ये, मार्केट परिसर, एस.टी. स्थानक परिसर, कॉलेज कॉर्नर, सांगली-मिरज रोड, बायपास रोड या ठिकाणी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. कलिंगडाला भावही चांगला मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे. 

कर्नाटकातील "नामधारी' (पाढरे रंगाचे) या कलिंगड जातीचीही आवक वाढली आहे. या जातीचे उत्पादन कर्नाटकातील रायबाग, कुडची, अथणी, विजापूर येथे होते. या जातीची कलिंगडेही मार्केटमध्ये दाखल झाली आहेत. 

कलिंगडाला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मिरज पूर्व भाग, सांगोला, पंढरपूर येथून "शुगर किन' या जातीच्या कलिंगडाला मोठी मागणी आहे. या कलिंगडाला 50 ते 500 रुपये डझन असा भाव मिळत आहे. 
- अशोक मदने, विष्णूअण्णा फळ मार्केट विक्रेते 

स्मार्ट टिप्स 

* पित्त वाढले किंवा डोके दुखत असल्यास कलिंगडाचा रस घ्यावा. 
* कच्च्या कलिंगडामुळे वायू व कफ होऊ शकतो. त्यामुळे तयार फळ खावे. 
* कलिंगडाचा लेप चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला तजेलदारपणा येतो. 

Web Title: watermelan in sangli