पश्चिम महाराष्ट्रात मुश्रीफ, पाटील यांना धक्का; सावंत विजयी

उदयनराजे भोसेले - हसन मुश्रीफ
उदयनराजे भोसेले - हसन मुश्रीफ

मुंबई- राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपालिका व 17 नगर पंचायतींसाठी रविवारी (ता. 27) मतदान झाले असून, आज (सोमवार) या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. कोल्हापूरमध्ये आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांना तर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना धक्का बसला आहे. तासगावमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजय सावंत विजयी झाले आहेत. सातारामध्ये उदयनराजे भोसले यांनी एकहाती सत्ता मिळविली.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा व अहमदनगर येथील निकाल पुढीलप्रमाणे-

-----------------------------------------
सोलापूर -
1) बार्शी – एकूण जागा 40.
राष्ट्रवादी – 6
शिवसेना – 6

प्रभाग क्रं 1 मधून राष्ट्रवादीचे उमेदवार पृथ्वीराज गणपतसिंग राजपूत व कल्पना आदिनाथ गायकवाड विजयी.
प्रभाग क्र. 2 मधून राष्ट्रवादीचे ज्योतिर्लिंग गुरुलिंग कुंभार व संगिता चंद्रकांत लांडे विजयी.

2) पंढरपूर
3) अक्कलकोट
4) करमाळा
करमाळा- 17 पैकी शहर विकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी

5) कुर्डूवाडी – 17 जागा
अंतिम निकाल
स्वाभिमानी  – 8
शिवसेना – 9
शिवसेनेची सत्ता कायम – नगराध्यक्ष शिवसेना – समीर मुलाणी

6) सांगोला
सांगोला नागरापालिक 18 पैकी
महायुतीचे 7 उमेदवार आघाडीवर.
शेकाप पिछाडीवर

7) मंगळवेढा
17 पैकी 4 काँग्रेस, 4 राष्ट्रवादी विजयी

8) मैंदर्गी
9) दुधनी
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना मोठा धक्का बसला आहे. दुधनी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर भाजपचा उमेदवार विजयी. भीमाशंकर इंगळे 121 मतांनी विजयी. पन्नास वर्षातली काँग्रेसची सत्ता पालटली.
-----------------------------------------
कोल्हापूर -
1) पन्हाळा - 17
जनसुराज्य पक्ष – 12
शाहू विकास आघाडी – 3
पन्हाळा विकास आघाडी- 2
नेता- विनय कोरे, जनसुराज्य पक्ष, स्थानिक आघाडीला धक्का

2) गडहिंग्लज - 17
जनता दल- 10
राष्ट्रवादी काँग्रेस – 4
भाजप- 3
विद्यामान आमदार हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर यांना धक्का

3) मुरगुड - 17
शिवसेना- 12
राष्ट्रवादी काँग्रेस – 2
पाटील गट- 1
अपक्ष- 2
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना धक्का

4) पेठवडगाव - 17
युवक क्रांती महाआघाडी- 13
यादव आघाडी – 4
आमदार सतेज पाटील यांना धक्का

5) मलकापूर - 17
भाजप- जनसुराज्य आघाडी- 9
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- 8
शिवसेना आमदार सत्यजित पाटील यांना धक्का

6) कुरुंदवाड - 17
काँग्रेस - 5
राष्ट्रवादी काँग्रेस- 6
भाजप- 6
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

7) कागल - 20
राष्ट्रवादी काँग्रेस- 11
भाजप- 9
कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व समरजितसिंह घाटगे यांना धक्का

8) जयसिंगपूर - 27
शाहू विकास आघाडी- 13 (राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष)
ताराराणी आघाडी- 9
अपक्ष- 02
-----------------------------------------
सांगली-
1) इस्लामपूर - 28
    विकास आघाडी : 13
    राष्ट्रवादी : 14
    अपक्ष : 1
जयंत पाटील यांची इस्लामपूर पालिकेतील 31 वर्षाची सत्ता संपुष्ठात

2) विटा - 24
काँग्रेस – 22
शिवसेना – 2
विटा नगरपालिकेवर पुन्हा काँग्रेसची सत्ता

3) आष्टा – 21
सत्ताधारी शहर विकास आघाडी- राष्ट्रवादी पुरस्कृत –  15
अपक्ष – 3
लोकशाही आघाडी 3

4) तासगाव –  21
भाजप - 13
राष्ट्रवादी - 8
भाजप नगराध्यश पदाचे उमेदवार विजय सावंत विजयी

5) कवठे-महांकाळ - 17
स्वाभिमानी आघाडी - 12
परिवर्तन आघाडी - 4
अपक्ष- 1

6) कडेगाव - 17
अंतिम निकाल
काँग्रेस – 10
भाजप –  7

7) खानापूर नगरपंचायत -  17

8) शिराळा

9) पलूस - 17
काँग्रेस – 12
स्वाभिमानी – 4
भाजप - 1
-----------------------------------------
सातारा -
साताऱ्यात मातब्बरांचे वर्चस्व कायम
सातारा- सातारा जिल्ह्यातील आठ पालिका, सहा नगरपंचायतींच्या निवडणूक निकालात जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी वर्चस्व कायम राखले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाडला सत्तांतर घडविले मात्र तेथील नदराध्यक्षपद भाजपकडे गेले. खासदार उदयनराजेंनी साताऱ्यात एकहाती सत्ता मिळविली, तर रामराजेंनी फलटणचा गड कायम राखला. वाई येथे बहुमत राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी मिळविले मात्र भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले.
पालिका, नगरपंचायतीसाठी जिल्ह्यात चुरसीने 74.81 टक्‍के मतदान झाले होते. सकाळी 10 वाजल्यापासून तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणीस प्रारंभ झाला. या निकालात कऱ्हाड पालिकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पॅनल एक हाती सत्ता मिळवत आमदार बाळासाहेब पाटील यांच्या सत्तेला सुरुंग लावला. मात्र, येथे भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रोहिणी शिंदे यांचा भरघोस मतांनी विजय झाला. त्यामुळे पृथ्वीराजबाबांची गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली. फलटणमध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नगराध्यक्षपदासह पालिकेवरही पूर्ण वर्चस्व राखले. कॉंग्रेसचा येथे पाडाव झाला. सातारा पालिकेत खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनोमिलन तुटल्याने दोन्ही गटांची समोरासमोर लढत झाली. यात उदयनराजेंचा करिष्मा चालला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी, नगरविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वेदांतिकाराजे भोसले यांचा सातारा विकास आघाडीच्या माधवी कदम यांनी पराभव केला. ही निवडणूक "राजघराणे की सर्वसामान्य' या मुद्यावर गाजली.
वाई पालिकेत आमदार मकरंद पाटील यांनी वर्चस्व कायम राखत 14 जागांवर विजय मिळविला. मात्र, येथे महाआघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. प्रतिभा शिंदे यांनी अवघ्या एका मताने विजय मिळविला. श्री. मकरंद पाटील यांनी माजी आमदार मदनदादा भोसले यांच्याकडील खंडाळा नगरपंचायतीत सत्ता खेचून आणत सत्तांतर घडविले. रहिमतपूर येथे राष्ट्रवादीने सत्ता कायम राखली, तर कोरेगाव येथे आमदार शशिकांत शिंदे यांना निसटती सत्ता मिळविण्यात यश आले. पाचगणीत लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी नगराध्यक्षपद अबाधित ठेवले. महाबळेश्‍वरला अपक्षांचीच बाजी असली तरी राष्ट्रवादी विचारांच्या स्वप्नाली शिंदे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या.
म्हसवड पालिकेत राष्ट्रवादीच्या शेखर गोरे यांनी कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांना धक्‍का देत सत्ता मिळविली. दहिवडीत जयकुमार गोरेंनी सत्तांतर घडविले. पाटणला माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, मेढा येथे राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली. वडूजला मात्र त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. एकंदरी या निकालात पृथ्वीराज चव्हाण, उदयनराजे, शशिकांत शिंदे यांनी यश दमदार यश मिळविले, तर बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजे, मदन भोसले, जयकुमार गोरे यांना फटका बसला.


1) सातारा

2) फलटण

3) कराड - 27
काँग्रेस - 16
राष्ट्रवादी – 6
भाजप - 4
इतर - 3
नगराध्यक्ष मात्र भाजपचे रोहिणी शिंदे

4) वाई

5) म्हसवड - 17
राष्ट्रवादी भाजप आणि रासप आघाडी – 10
क़ॉंग्रेस – 7

6) रहिमतपूर - 17
राष्ट्रवादी – 13
काँग्रेस – 4

7) महाबळेश्वर

8) पाचगणी

9) कोरेगाव

10) मेढा

11) पाटण

12) वडूज - 17
राष्ट्रवादी – 5
काँग्रेस – 5
भाजप  – 3
इतर – 4

13) खंडाळा

14) दहिवडी
-----------------------------------------
अहमदनगर -

1) संगमनेर

2) कोपरगाव

3) श्रीरामपूर

4) शिर्डी

5) रहाता

6) पाथर्डी

7) राहुरी

8) देवळाली प्रवरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com