महिलेचा न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

सांगली - घटस्फोटाचा अर्ज निकाली काढल्यानंतर पुन्हा पतीसोबत नांदायचे आहे, असे सांगून स्वाती महेश शिंदे (साळशिंगे, ता. खानापूर) हिने न्यायाधीशांसमोरच स्वत:च्या गळ्याला चाकू लावला. सोमवारी (ता. 30) सायंकाळी प्रकार घडला. महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. आत्महत्येचा प्रयत्न, न्यायालयीन कामकाजात अडथळा आणि न्यायालयाच्या अवमानाबद्दल शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक केल्यानंतर जामिनावर सुटका झाली. 

स्वाती शिंदे हिचे माहेर साळशिंगे येथे आहे. महेश शिंदे (मंगरूळ-चिंचणी, ता. खानापूर) याच्याशी तिचा 2014 मध्ये विवाह झाला. महेश शिंदे अभियंता आहे. ऑस्ट्रेलियात एका कंपनीत तो नोकरी करतो. विवाहानंतर काही दिवसांनी स्वाती आणि महेश यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने स्वाती माहेरी राहायला आली. ऑगस्ट 2016 मध्ये तिने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्जावर सुनावणी होऊन काल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तो निकाली काढला. निकालानंतर स्वातीने पतीसोबत नांदायचे आहे, असे न्यायाधीशांना सांगितले. न्यायाधीशांनी तिच्या पतीला बोलावण्यास सांगितले. तोपर्यंत महेश सांगलीहून गावाकडे निघाला होता. पती आला नाही म्हणून स्वातीने पर्समधून धारदार चाकू काढून स्वत:च्या गळ्याला लावला. "या यंत्रणेवर माझा विश्‍वास नाही. सर्व यंत्रणा भ्रष्ट झाली आहे' असा थेट आरोपही केला. 

टॅग्स

पश्चिम महाराष्ट्र

स्टुडंट युनियनची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने कोल्हापूर : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज सरसकट माफ व्हावे, केजी टू पीजी...

05.03 AM

सोलापूर : आपल्यांना मनातलं काही तरी सांगायचं, पण नातं तुटण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत नाव न सांगता एखादी गोष्ट सांगायला मिळाली...

04.03 AM

विद्यापीठात राज्य महिला आयोगाची कार्यशाळा कोल्हापूर: भारतीय राज्यघटनेने स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व स्वीकारले असले तरी...

03.33 AM