वुमेन्स अँड सोशल फाउंडेशनचे उपोषण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

कोल्हापूर -‘सर्किट बेंच आमच्या हक्काचं...’ अशी घोषणाबाजी करत कसबा बावड्यातील वुमेन्स अँड सोशल फाउंडेशनच्या दीडशेहून अधिक महिलांनी साखळी उपोषणाचा आजचा १०४ वा दिवस गाजवला. 

कोल्हापूर -‘सर्किट बेंच आमच्या हक्काचं...’ अशी घोषणाबाजी करत कसबा बावड्यातील वुमेन्स अँड सोशल फाउंडेशनच्या दीडशेहून अधिक महिलांनी साखळी उपोषणाचा आजचा १०४ वा दिवस गाजवला. 

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू व्हावे, या मागणीसाठी वकिलांच्या सुरू असणाऱ्या साखळी उपोषणाची शतकपूर्ती नुकतीच झाली. याबाबत अद्यापही राज्य शासनाला जाग आलेली नाही. वकिलांच्या या आंदोलनास कसबा बावडा येथील वुमेन्स अँड सोशल फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी पाठिंबा दर्शविला. त्यांनी आज छोट्या मुलांसमवेत साखळी उपोषण केले. जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी परिसर दणाणून सोडला. वकिलांच्या आंदोलनात संस्थेच्या महिला कोठे कमी पडणार नाहीत. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी भूमिका महिलांनी या वेळी स्पष्ट केली. त्यांचे स्वागत खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे व माजी अध्यक्ष ॲड. विवेक घाटगे यांनी केले. 

आंदोलनात संस्थेच्या अध्यक्षा वंदना कांबळे, उपाध्यक्ष संगीता पाटील, सुनीता लोकरे, सीमा वाईंगडे, वहिदा गोलंदाज, शुभांगी कांबळे, चंद्रभागा गुर्जर, सुमन कांबळे, आक्काताई कांबळे, लक्ष्मी सारंग, आनंदी भोई, रूपाली कांबळे, रंजना पाटील, विद्या चौगुले, इंदुबाई पाटील, नीलम चौगुले, शांताबाई डावकरे, शोभा पाटील, हौसाबाई जाधव, रूपाली पाटील, शोभा पवार, सुनीता पाटील, वर्षा कदम, सीमा पोवार, माधवी निंबाळकर आदी महिला सहभागी झाल्या होत्या. सहायक पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील यांनी आंदोलकांना सरबत दिला. त्यानंतर आजच्या उपोषणाची सांगता झाली.

Web Title: Women and Social Foundation fast