'महिलांनी सर्वच क्षेत्रांत सातत्यपूर्ण काम करावे'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

कोल्हापूर - महिलांनी संधीचा लाभ उठवत सर्व क्षेत्रांत सातत्यपूर्ण काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील यांनी केले. 

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराचे तसेच आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

कोल्हापूर - महिलांनी संधीचा लाभ उठवत सर्व क्षेत्रांत सातत्यपूर्ण काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील यांनी केले. 

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराचे तसेच आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, ‘‘मुलांच्या तुलनेत मुलींचा कमी असलेला जननदर ही चिंतेची बाब असून मुलींचा जननदर वाढविण्यासाठी यापुढील काळात सामाजिक जाणिवेच्या भावनेतून जिल्ह्याला लागलेला स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सक्रिय व्हावे. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध कायदे प्रभावीपणे राबविले जात आहेत. त्यासाठी लोकसहभाग वाढविण्याची आवश्‍यकता आहे.’’ 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे म्हणाले, ‘‘कौटुंबिक हिंसाचार ही चिंतेची बाब असून कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी असणाऱ्या कायद्यांचे प्रभावी पालन करण्याबरोबरच महिलांसाठी असणाऱ्या विविध कायद्यांविषयी त्यांच्यामध्ये साक्षरता निर्माण करणे आवश्‍यक बनले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने कायदा साक्षरतेचे विविध उपक्रम हाती घेतले असून वाद निवारणामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.’’ महिला व बाल कल्याण सभापती ज्योती पाटील, आरोग्य सभापती सीमा पाटील, राणी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र खाडे यांची भाषणे झाली. अनघा सूर्यवंशी, सिद्धी बेलेकर यांच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांनी स्वागत केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, हरीष जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, प्रमोदिनी जाधव, अर्जुन आबिटकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात अंगणवाडी सेविका सुवर्णा रंगराव पाटील (पिराचीवाडी, ता. कागल) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्कार केलेल्या अंगणवाडीच्या महिलांची नावे अशी : शोभा देसाई, नंदा पोवार, राजश्री पाटील, शोभा धुमाळ, लक्ष्मी खोत, वैजयंती राजिगरे, रेणुका पाटील, पुष्पा बागल, उज्ज्वला गावडे, आशालता बेकनाळकर, रेखा पाटील, मीना निलवे, भारती कोळेकर, बाळाबाई शिंदे, नंदा कांबळे, दीपाली सूर्यवंशी, अक्‍काताई पाटील, शहिदा शेख, भारती होळकर, सफुरा शेखजी, चित्रा वाशीकर, सुवर्णा बन्ने, स्मिता पाटील, छायाताई पाटील, सुवर्णा पोवार, सारिका पाटील, अर्चना पाटील, संगीता पाटील, ललिता कुलकर्णी, जयश्री मजगे, दीपाली पाटील, रेश्‍मा शेख, चित्रा माने, अंजना सातपुते, संपदा माने, बायना पोवार, स्वाती पाटील, रंजना जाधव, हेमा गुरव, नंदा पाटील, सुप्रिया पाटील, कविता पाटील, वैशाली सुतार, लक्ष्मी पाटील, सुवर्णा मगदूम, मीनाक्षी गुरव, सुमन शिरगावे, संगीता पाटील.

आरोग्य केंद्रांचा गौरव
सेवा रुग्णालय कसबा बावडा याला विशेष ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. 
याशिवाय डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार मिळालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची नावे अशी : माळ्याची शिरोली (ता. करवीर), जयसिंगपूर (ता. शिरोळ), कळे (ता. पन्हाळा), शेळोली (ता. भुदरगड), निगवे (ता. करवीर), तेलवे (ता. पन्हाळा).

Web Title: women day celebration