महिलांना शंभर टक्के संरक्षणही देण्याची गरज - अंजली देवकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

नगर - महिलांनी सक्षम होणे, स्वत:च्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज झाली आहे. महिलांवर होणारे अत्याचार व अन्याय हे महिलाच रोखू शकतील. त्यामुळे महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत. सरकारने महिलांना 50 टक्के आरक्षणाबरोबरच शंभर टक्के संरक्षण देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन क्रीडापटू अंजली देवकर यांनी केले. 

जिल्हा अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या 12 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत देवकर बोलत होत्या. बाजार समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. 

या वेळी पतसंस्थेच्या अध्यक्षा नसीम बानो शेख, उपाध्यक्षा आशा दारकुंडे, सचिव स्मिता औटी, संचालिका शोभा शेवाळे, रूपाली जाधव, सुंदर धावडे, संगीता नारे, अंजना ठाणगे, कविता कापसे, सुलभा जाधव, कालिंदा शिंदे, सुजाता अडसुरे, शैलजा उदमले, विद्या दुसुंगे, सुनीता हराळे, लिपिक अल्ताफ शेख, पतसंस्थेच्या संस्थापिका सुमन सप्रे, माजी संचालिका सुमन कल्हापुरे, कमल जरे, शशिकला भापकर, पुष्पा सोनवणे आदी उपस्थित होत्या. 

नसीम बानो शेख यांनी अहवाल सादर केला. पतसंस्थेकडे एक कोटी पाच लाख 39 हजारांच्या ठेवी असून, पतसंस्थेला नऊ लाख एक हजार 669 रुपयांचा नफा झालेला आहे. सभासदांना 12 टक्के डिव्हिडंट दिला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

पश्चिम महाराष्ट्र

करमाळा : श्रीदेवीचामाळ (ता. करमाळा) येथे 96 पायऱ्याच्या विहीरीत पडून वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. या 96...

02.39 PM

सांगली : येथील कृष्णा नदीपात्रात 18 फूट मगर दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही मगर दिसल्याने कृष्णा नदी...

12.45 PM

सातारा - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे बंधू आणि हिंदू एकता आंदोलनाचे युवा कायकर्ते...

09.45 AM