सहा समित्यांत महिलाराज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

सातारा - जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांत निर्विवादपणे सभापतींच्या निवडी करत राष्ट्रवादीने सातारा जिल्ह्यात "बाजीगर' असल्याचे आजही सिद्ध केले. तब्बल सहा समित्यांत महिलाराज आले असून, महाबळेश्‍वर समितीत सभापती अन्‌ उपसभापतिपदही महिलांना देण्यात आले. खंडाळा समितीत उपसभापतिपदाची संधी वंदना अविनाश धायगुडे यांनी मिळाल्याने कॉंग्रेसला केवळ खंडाळ्यात सत्तेचा दिलासा मिळाला. 

सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीची प्रक्रिया आज 11 पंचायत समित्यांत झाली. निकाल घोषित झाल्यापासून लागलेले निवडीचे वेध अखेर आज पूर्ण झाले. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कऱ्हाड समितीत आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर गटाने एकत्र येऊन भापजला सत्तेपासून दूर ठेवले. सभापतिपद बाळासाहेब पाटील गटाला, तर उपसभापतिपद उंडाळकर गटाला देऊन पुढील आमदारकीची जुळणीही साधली. महाबळेश्‍वर समितीत सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले होते. तेथे रूपाली राजेंद्र राजपुरे यांची वर्णी लागली. उपसभापतिपदीही अंजना कदम यांची निवड केल्याने तेथे पूर्ण महिलाराज आले. केवळ महाबळेश्‍वर, खंडाळा येथे उपसभापतिपदी महिलांना संधी देण्यात आली, तर सर्वत्र खुल्या प्रवर्गातील पुरुषांना संधी दिली आहे. 

फलटण समितीत शिवरूपराजे खर्डेकर यांना उपसभापतिपदी संधी देऊन समितीवर निंबाळकर, खर्डेकर घराण्याने वर्चस्व ठेवले. गेल्या वेळी पाटण, कोरेगावमध्ये समसमान बलाबल झाल्याने चिठ्ठीचा खेळ खेळण्यात आला होता. आज मात्र, राष्ट्रवादीला सर्वत्र बहुमत मिळाल्याने अशी वेळ आली नाही. 

फक्‍त साताऱ्यात मतदान 
सातारा वगळता दहा पंचायत समित्यांच्या पदाधिकारी निवडी बिनविरोध पार पडल्या. मात्र, साताऱ्यात सत्ताधारी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या विरोधात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले गटाने शड्डू ठोकले. सातारा समितीत केवळ मतदानाने निवडी झाल्या. तेथे 11 विरुद्ध नऊ असा "सामना' आमदार गटाने जिंकला. 

Web Title: women in six committees