आढळगावात पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

श्रीगोंदे : कुकडी प्रकल्पातून पाणी सुटले, तरी गावात पिण्याचे पाणी नसल्याने आक्रमक झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर आज हंडा मोर्चा काढला. सरपंचांनी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य शिवप्रसाद उबाळे म्हणाले, की काही महिन्यांपासून गावातील पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली आहे. अनेक वेळा सत्ताधाऱ्यांसह ग्रामसेवकाला सांगितले; मात्र पाणी मिळत नाही. त्यात "कुकडी'चे पाणीही फिरल्याने पाणीपुरवठा करणारे स्रोत भरले. मात्र, किरकोळ दुरुस्तीकडे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने गाव तहानलेले आहे.

श्रीगोंदे : कुकडी प्रकल्पातून पाणी सुटले, तरी गावात पिण्याचे पाणी नसल्याने आक्रमक झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर आज हंडा मोर्चा काढला. सरपंचांनी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य शिवप्रसाद उबाळे म्हणाले, की काही महिन्यांपासून गावातील पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली आहे. अनेक वेळा सत्ताधाऱ्यांसह ग्रामसेवकाला सांगितले; मात्र पाणी मिळत नाही. त्यात "कुकडी'चे पाणीही फिरल्याने पाणीपुरवठा करणारे स्रोत भरले. मात्र, किरकोळ दुरुस्तीकडे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने गाव तहानलेले आहे. सरपंच मीरा वाकडे यांनी आंदोलक महिलांना पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्याबाबतचे लेखी पत्र दिले. 

Web Title: women's rally about water crisis