भांडवलीतील जलसंधारणाचे काम भारावण्याजोगे

malawdi.
malawdi.

मलवडी - भांडवली (ता. माण) येथील ग्रामस्थांनी श्रमदानाच्या माध्यमातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाने भारावून गेलेल्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी बारामती, इंदापूर, पुरंदर येथील दुष्काळी तेहतीस गावातील दीडशे ग्रामस्थांना भांडवलीच्या शिवाराची सैर घडवली.

यावेळी माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, माणचे सभापती रमेश पाटोळे, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, म्हसवडच्या उपनगराध्यक्ष स्नेहल सुर्यवंशी, दहिवडीचे नगरसेवक अजित पवार, दादासाहेब चोपडे, रमेश शिंदे, प्रशांत विरकर व मान्यवर उपस्थित होते.

अतिशय शास्त्रशुद्ध, दर्जेदार व आखीव-रेखीव जलसंधारणाची कामे पाहून बारामती, इंदापूर व पुरंदर येथील ग्रामस्थांसह मान्यवर मंडळी आश्चर्यचकित होत होती. रविवारी जोरदार पाऊस पडूनसुध्दा सलग समतल चर, खोल सलग समतल चर, अनघड दगडी बांध, बांध-बंदिस्ती, माती नाला बांध यातील एकही संरचना फुटली नव्हती. याबद्दल पाहुण्यांनी आखणारांचे व खोदणारांचे विशेष कौतुक केले. गावाच्या एकजुटीचे, देणगीदारांचे अभिनंदन करत असेच काम आपल्या गावात करण्याचा निर्धार पाहुण्यांनी केला.

उपसरपंच सुनिल सुर्यवंशी व त्यांच्या पत्नी कविता सुर्यवंशी यांनी दिलेले योगदान अमूल्य असून या पध्दतीने प्रत्येकाने काम केले तर गावागावामध्ये अमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे मागील पंधरा दिवसात दोनदा अतिवृष्टी होवून सुध्दा येथील जलसंधारणाची एकही रचना तुटली, फुटली नाही. यावरुन लक्षात येते की काम किती शास्त्रशुद्ध झाले आहे.

 "जलसंधारणाची कामे अनेक ठिकाणी झाली आहेत पण यापध्दतीचे उत्कृष्ट काम मी कुठेही पाहिले नाही." सुनंदा पवार, विश्वस्त, अॅग्रीकल्चरल ट्रस्ट बारामती.

बारामती, इंदापूर व पुरंदर येथील ग्रामस्थांनी पाहणी करुन केलेले कौतुक ही भांडवलीकरांच्या कामाची पोहचपावती आहे." प्रभाकर देशमुख, माजी विभागीय आयुक्त.

फक्त करायचे म्हणून काम न करता मनापासून केलेले जलसंधारणाचे काम पाहायचे असेल तर एकवेळ भांडवलीला अवश्य भेट द्यावी." रोहित पवार, जिल्हा परिषद सदस्य पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com